आजचे राशिभविष्य मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५

१९ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

श्रावण कृष्ण एकादशी/द्वादशी. वर्षा ऋतू. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज चांगला दिवस आहे” *अजा एकादशी*

नक्षत्र – आर्द्रा.

आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन. (वज्र योग)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

(Marathi Rashi Bhavishya)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळाशी अशुभ योग तर गुरूशी युती आहे. कलाकारांना उत्तम दिवस आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. वक्तृत्व चमकेल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. लेखक, शिक्षक याना उत्तम दिवस आहे.

वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मनातील इच्छा पूर्ण होतील. आनंदी राहाल. कौटुंबिक मतभेद संपतील. आर्थिक वाढ होईल आणि त्याचे योग्य नियोजन कराल. अचानक लाभ होतील. लॉटरी किंवा शेअर्स मध्ये लाभ होऊ शकतात.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) ज्ञान आणि धर्म यांची जोड घातली जाईल. अनुकूल दिवस आहे. प्रिय व्यक्ती भेटतील. उत्साह वाढेल. भेटवस्तू मिळतील. धनधान्य वाढेल. दयाळूपणा दाखवाल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र ग्रहमान आहे. आज तुमची परीक्षा होणार आहे. शुभ कार्यासाठी खर्च कराल. स्वप्ने साकार होतील. नात्यात गैरसमज होऊ शकतात. भलत्या ठिकाणी धाडस करू नका.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. चंद्र आणि गुरू शुभ आहेत. आज सुखद अनुभव येतील. नोकरी/ व्यवसायात यश मिळेल. समृद्धी अनुभवायला मिळेल. महत्वाकांक्षा पूर्ण होतील. शब्द देताना काळजी घ्या.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. तरुणांना आज नोकरीच्या चांगल्या संधी प्राप्त होतील. न्यायप्रियता दिसून येईल. प्रसिद्धी मिळेल. क्रोध करू नका.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नवम स्थानी चंद्र आहे. उत्साह वाढेल. आनंदी घटना घडतील. अचानक लाभ होतील. भाग्योदय होईल. तीर्थाटन घडेल. ज्ञानाचा योग्य उपयोग होईल. जमीन व्यवहारात मात्र अपेक्षित यश मिळणार नाही.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अष्टम स्थानी चंद्र आहे. शत्रू पराभूत होतील. अध्यात्मिक ज्ञान प्रपात होईल. गूढ बाबीची आवड निर्माण होईल. वारसा हक्काने संपत्ती मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. संपत्ती वाढेल. वैवाहिक जीवनात समाधान लाभेल. शुभ संचाहर समजतील. काही जुने वाद मिटतील. विश्वासू मित्राची भेट होईल.

मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुम्हाला सदाचाराने वागणे आवडते. आज त्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. व्यावसायिक लाभ होतील. धन संपत्ती वाढेल. आरोग्य सुधारेल. शत्रूवर विजय प्राप्त होईल. वरिष्ठ काहीसे नाराज होऊ शकतात.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पंचम स्थानी चंद्र गुरू युती आहे. शिक्षणात उत्तम यश मिळेल. वाहन सुखय लाभेल. प्रवास घडतील. रचनात्मक कार्य होईल. भाग्य चमकेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. सुख, समृद्धी अनुभवास येईल. जमीन संबंधित कामे पूर्ण होतील. वेळ दवडू नका. हाती घ्याल ते कार्य तडीस न्याल. इतरांना मदत कराल. वाहन सौख्य लाभेल.

१९ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यात भरपूर उत्साह आहे. कोणताही विषय ठराविक पद्धतीने हाताळणे तुम्हाला आवडते. शास्त्र, संशोधन, शोध प्रबंध यात तुम्हाला रस असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः आणि त तेही झटपट घेतात. विविध मैदानी खेळांची आवड असते. तुम्ही अत्यंत उतावीळ असतात. इतरांची सिक्रेटस तुम्ही जपून ठेवतात. त्याचा गैरवापर किंवा उच्चार करत नाहीत. तुम्ही यशस्वी, प्रामाणिक आहेत. मात्रतुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. बोलण्यापेक्षा लेखनातून तुम्हीं अधिक चांगले व्यक्त होऊ शकतात. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि ज्ञानामुळे इतरांच्या मनात तुमच्याबद्दल आदराची भावना निर्माण होते. वडील, सासरे, बायको, आई इत्यादी नातेवाईकांच्या मुळे तुम्हाला आर्थिक फायदा होतो. वयाच्या 46 व्या वर्षापासून तुम्हाला यश मिळते. तुम्ही नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत असतात आणि तुम्हाला धंद्यातही यश मिळते. तुम्ही प्रामाणिक आहात. स्वतःच्या विचारशक्तीमुळे आणि स्वभाव वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला कीर्ती मिळते किंवा कधी कधी अपकर्ती देखील होऊ शकते. तुमचे आरोग्य चांगले असते आणि आजारपणातून तुम्ही लवकर बरे होतात. तुम्ही चाकोरीच्या बाहेर जाऊन इतर

व्यवसाय:- जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शक, मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, कॅन्टीन, बँकिंग, सेल्स मॅनेजर, पुस्तक विक्रेता, आणि आयात निर्यात अधिकारी.

शुभ दिवस:– रविवार, सोमवार, मंगळवार.

शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, जांभळा.

शुभ रत्न:- माणिक, पुष्कराज, अंबर.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!