ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद शुक्ल तृतीया/चतुर्थी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी ३ ते ४.३०
“आज उत्तम दिवस आहे” *हरितालिका*
चंद्रनक्षत्र – हस्त.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
(Marathi Rashi Bhavishya)
२६ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवी आणि शनी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही मनाने चंचल आहात. आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. सहजपणे पैसे मिळतात. आपण चांगले दिसावे यांकडे तुमचा कटाक्ष असतो. पेमप्रकरणात समस्या निर्माण होतात. त्यावर मार्ग सापडत नाही. घरातील व्यक्ती आणि प्रिय जनांबद्दल खूप प्रेम असते. प्रेमळ असतात पण स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाहीत. तुमचे विचार विधायक आणि क्रियाशील असतात. हिप्नॉटिझम, गूढ विद्या यांची तुम्हाला आवड असते. तुम्ही धाडसी, प्रभावी आणि बुद्धिमान आहात. संशोधन, ज्ञान याबद्दल तुम्हाला आवड आहे. तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड असते. उथळ संगीतापेक्षा गंभीर संगीत तुम्हाला आवडते. तुम्ही कडक शिस्तीचे भोक्ते आहात आणि कर्तबगार आहात. तुम्हाला शांतता आणि एकांत आवडतो. निसर्ग, फुले, रम्य देखावा, याची तुम्हाला ओढ असते. तुम्ही कधी कधी अति निराशावादी होतात. समाजापासून दूर राहणे पसंत करतात. भविष्याबद्दल तुम्हाला नेहमीच काळजी वाटत असते. तुम्ही अत्यंत धोरणी, हुशार आणि मुत्सद्दी आहात. तसेच महत्त्वाकांक्षी आणि दिर्घउद्योगी देखील आहात मात्र अति महत्त्वाकांक्षा असता कामा नये. तुम्हाला जी गोष्ट हवी असते त्यासाठी तुम्ही प्रचंड मे
व्यवसाय:- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, उच्च गणित, कोळसा, लाकूड, लोखंड, व्यवस्थापक, कंपनी सेक्रेटरी.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.
शुभ रंग:- निळा, जांभळा, काळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) षष्ठ स्थानी चंद्र आहे. मंगळाच्या युतीत आहे. मन:स्वास्थ चांगले राहील. जमिनिसंबंधीत कामातून उत्पन्न मिळेल. वाहन सौख्याचा दिवस. भय दाटून येईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. छोटे प्रवास घडतील. लेखनातून लाभ होईल. आवडते छंद जोपासाल. आज तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) चतुर्थ स्थानी चंदनर मंगळ युती आहे. तुमचा दबदबा वाढेल. मन प्रसन्न राहील. शेजाऱ्यांशी वाद संभवतात. बागेत फिरताना कळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) छोटे प्रवास लाभदायक ठरतील. लेखनातून लाभ होईल. आवडते छंद जोपासाल. भावंडांकडून लाभ होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सत्संग घडेल. आर्थिक लाभ होतील. योग्य कारणासाठी खर्च होईल. घरात तुमचे वर्चस्व राहील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. सरकारी योजनेतून लाभ होईल. दागिने खरेदी होईल. सहलीचे बेत ठरतील. मन कठोर होईल. योग्य न्याय करा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यय स्थानी चंद्र आहे. जबाबदारी वाढेल. कामानिमित्त प्रवास होतील. सरकारी कामे मार्गी लागतील. स्वतःच्या चुकांमुळे खर्च वाढतील.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम दिवस. मानसन्मान मिळेल. दूरचे प्रवास होतील. राशीस्वामी खुश आहे. त्याचा लाभ घ्या. मनासारखी कामे होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभदायक दिवस आहे. भेटवस्तू मिळेल. प्रवास होतील. लक्ष्मी योग आहे. उत्तम भाग्य योग आहे. वेळ दवडू नका.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अष्टम स्थानी चंद्र मंगळ युती आहे. धनप्राप्ती होईल. संततीची काळजी वाटेल. आरोग्य सांभाळा. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) शेअर्स मध्ये लाभ होईल. अचानक लाभ होतील. प्रेमात यश. कोर्ट कामात यश मिळेल. प्रेमात यश मिळेल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य मंगळवार, २६ ऑगस्ट २०२… […]