
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
पौष शुक्ल तृतीया/चतुर्थी. हेमंत ऋतू. उत्तरायण.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते ४.३०
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर. (व्याघात योग शांती)
नक्षत्र – श्रवण. विनायक चतुर्थी (अंगारक योग)
२३ डिसेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुम्ही सखोल अभ्यास, महत्वाकांक्षा, शांतताप्रेमी आणि कायदा पालन करणारे आहात. तुम्हाला तुमच्या योग्य मित्र सहसा मिळत नाहीत. प्रत्येक गोष्टीची तुम्हाला घाई असते. त्यामुळे कधीकधी नुकसान होऊ शकते. पाण्याजवळ तुमचा व्यवसाय अधिक चांगला चालतो. तुमचे वक्तृत्व उत्तम असते. शब्दसाठा चांगला असतो. भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही अधिक लोकप्रिय असतात. संगीत, काव्य, साहित्यआणि प्रवास यांची तुम्हाला आवड असते. स्वतः मध्ये मग्न राहणे तुम्हला प्रिय आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश असतात. सरकारी मान मरातब मिळतात.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ अंक:- १,३,५.
शुभ रंग:- हिरवा.
मेष:अष्टम स्थानातील बुधाशी चंद्राचा लाभ योग आहे. धन संपत्ती बाबत काही वाद किंवा संभ्रम निर्माण होऊ शकतात. आज केलेली उपासना उत्तम फलदायी ठरेल.
वृषभ: अचानक एखादा खर्च सामोरा येऊ शकतो. रवी मंगळ अनुकूल नाहीत. प्रशासकीय कामांमध्ये हलगर्जी नको. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करा.
मिथुन: अष्टम स्थानी चंद्र आहे. प्रिय व्यक्तीच्या नाराजीचा आज अनुभव येऊ शकतो. तुमचा स्वभाव आक्रमक नाही. मात्र आज काहीशा निराशेचा सामना करावा लागू शकतो. मन शांत ठेवा.
कर्क: सप्तम स्थानी चंद्र आहे. एखादे येणारे संकट आज टळेल. मात्र त्याच्या काही खुणा दिसून येऊ शकतात. श्री. दत्तगुरूंची उपासना लाभदायक ठरेल.
सिंह: व्यावसायिक प्रगती चालूच राहणार आहे. अनुकूल गुरुची उत्तम साथ लाभत आहे. आज प्रिय व्यक्तीची नाराजी ओढवून घेऊ नका. वाहन जपून चालवा.
कन्या: पंचम चंद्र, चतुर्थ शुक्र आणि नवम हर्षल अशी ग्रहस्थिती आहे. घरगुती कटकटी होऊ शकतात. वाहन दुरुस्ती करावी लागू शकते. मकर राशीतील चंद्र काहीसे उशिरा पण भरघोस यश देईन.
तुळ: राजकीय क्षेत्रात तुमच्या सल्ल्याला किंमत आहे. आज त्याचे मोल जाणवेल. भेटवस्तू मिळतील. मात्र आज खर्चात देखील वाढ होणार आहे.
वृश्चिक: प्रगती करणारे ग्रहमान आहे. व्यवसाय वाढीसाठी पूरक वातावरण आहे. मात्र शत्रू कडून किंवा भरवश्याच्या व्यक्ती कडून धोका होऊ शकतो. सावध राहा.
धनु: तुमच्या षष्ठ स्थानी हर्षल आहे. आज अनेक प्रलोभने येतील मात्र ती टाळणे हिताचे आहे. शत्रूत्रास जाणवेल. शांतपणे परिस्थिती हाताळा. आज शब्दाला मान मिळेल.
मकर: आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. मनाला उभारी देणारे ग्रहमान आहे. अनुकूल शुक्र तुम्हाला भौतिक सुखे देईन. मेजवानीचे बेत आखले जातील.
कुंभ: व्यय स्थानी चंद्र आहे. चतुर्थ स्थानी हर्षल आहे. ग्रहमान अनुकूल नाही. घरात शांतता राखा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. राजकीय भूमिका घेताना सावध रहा. विनाकारण व्यक्त होऊ देऊ नका.
मीन: चंद्राच्या नक्षत्रातील चंद्र अनुकूल आहे. मनोकामना पूर्ण होणारा दिवस आहे. साडेसातीचा त्रास काहीसा कमी जाणवेल. लेखन करतांना सावधगिरी बाळगा. आज महिलांकडून लाभ होतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)




