
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
फाल्गुन शुक्ल अष्टमी.शके १९४७, संवत २०८२.वसंत ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज उत्तम दिवस आहे.चंद्रनक्षत्र – रोहिणी / (दुपारी १.३९ नंतर) मृगशीर्ष.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.
विषकुंभ योग.(Marathi Rashi Bhavishya)
चंद्र त्रिकोण मंगल, चंद्र केंद्र बुध, चंद्र केंद्र शुक्र – कार्यसिद्धी, आर्थिक लाभ आणि प्रेमसौख्य देणारे ग्रहमान.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)आज आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रपरिवारातून मदत मिळेल. नवीन कल्पना राबवाल. वाहन चालवताना काळजी घ्या. उतावळेपणा टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)मन काहीसे चंचल राहील. गुप्त लाभ संभवतो. प्रवासाचे नियोजन होईल. लेखन, संवाद यातून यश मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)मित्रांकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासाठी वेळ द्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. शब्दाला मान मिळेल. मात्र अहंकार टाळा.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. प्रवास योग संभवतो. संशोधन आणि अभ्यासात यश मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)भागीदारीत लाभ होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)कामाचा ताण वाढेल पण त्यातूनच यश मिळेल. शत्रू निष्प्रभ ठरतील. आरोग्यात सुधारणा होईल. संयम ठेवा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)सर्जनशीलतेला वाव मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. अनपेक्षित लाभ संभवतो.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. स्थावर मालमत्तेचे व्यवहार लाभदायक ठरतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)लहान प्रवास संभवतो. भावंडांशी संबंध सुधारतील. धाडसी निर्णय घ्याल. कागदपत्रे तपासूनच सही करा.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)ग्रहमान अनुकूल आहे. आर्थिक लाभ आणि प्रतिष्ठा वाढेल. आध्यात्मिक कार्यात समाधान मिळेल. प्रलोभने टाळा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


