

(Marathi Rashi Bhavishya)
तिथी: माघ कृष्ण पक्ष द्वितीया
नक्षत्र: मघा (दिवसभर)
योग: शुभकरण: तैतिल
राहू काळ- दुपारी ३.०० ते ४.३० (स्थानिक वेळेनुसार)
सूर्योदय – सूर्यास्त
सूर्योदय: सकाळी ७.०९
सूर्यास्त: संध्याकाळी ६.१५
आज जन्मलेल्या बाळाची जन्मराशी: सिंह
नक्षत्र: मघा
स्वभाव: नेतृत्वगुण, आत्मविश्वासी, स्वाभिमानी (Marathi Rashi Bhavishya)
शुभ अक्षरे: मा, मी, मू, मे
मेष-आज आत्मविश्वास वाढलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ रंग: लाल | शुभ अंक: ९
वृषभ-आज खर्च वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना घाई करू नका. वैवाहिक जीवनात संवाद महत्त्वाचा ठरेल. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः पोटाशी संबंधित त्रास.
शुभ रंग: पांढरा | शुभ अंक: ६
मिथुन-नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. व्यवसायात प्रगती दिसेल. प्रवासाचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला. मन प्रसन्न राहील.
शुभ रंग: हिरवा | शुभ अंक: ५
कर्क-आज भावनिक निर्णय टाळावेत. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. नोकरीत बदलाचे संकेत आहेत. संयम ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने जाईल.
शुभ रंग: चांदी | शुभ अंक: २
सिंह-आज मान-सन्मानात वाढ होईल. नेतृत्वगुणांना वाव मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील. आत्मविश्वासामुळे यश मिळेल.
शुभ रंग: सोनेरी | शुभ अंक: १
कन्या-आज कामाचा ताण जाणवू शकतो. वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा. आरोग्यासाठी विश्रांती गरजेची.
शुभ रंग: निळा | शुभ अंक: ५
तुला-आज नशिबाची साथ मिळेल. नवीन संधी चालून येतील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत अनुकूल निर्णय मिळू शकतो.
शुभ रंग: गुलाबी | शुभ अंक: ६
वृश्चिक-आज गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सतर्कता आवश्यक. अध्यात्माकडे ओढ वाढेल. संयम ठेवल्यास दिवस चांगला जाईल.
शुभ रंग: मरून | शुभ अंक: ८
धनु-आज नवीन योजना आखण्यासाठी उत्तम दिवस. नोकरीत बढतीचे संकेत. प्रवास लाभदायक ठरेल. कुटुंबात आनंदाची बातमी मिळू शकते.
शुभ रंग: पिवळा | शुभ अंक: ३
मकर-आज मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक स्थैर्य राहील. आरोग्य चांगले, मात्र थंडीपासून काळजी घ्या.
शुभ रंग: करडा | शुभ अंक: १०
कुंभ-आज विचारांमध्ये स्पष्टता येईल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. नवीन मित्र जोडले जातील. आर्थिक बाबतीत संतुलन ठेवा.
शुभ रंग: जांभळा | शुभ अंक: ४
मीन-आज मन प्रसन्न राहील. कला, लेखन, संगीत क्षेत्रातील लोकांसाठी शुभ दिवस. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेमात सकारात्मक बदल होतील.
शुभ रंग: आकाशी | शुभ अंक: ७

