आजचे राशीभविष्य – मंगळवार, १ जुलै २०२५
१ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
🔹 आषाढ शुक्ल षष्ठी | शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसुनाम संवत्सर | वर्षा ऋतू
🔹 चंद्र नक्षत्र: पूर्वा (फाल्गुनी)
🔹 राहुकाळ: दुपारी ३.०० ते ४.३०
🔹 विशेष सूचना: संध्याकाळी ५.०० नंतर शुभ काळ सुरू होईल.
🔹 आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह/कन्या (व्यतिपात योग शांती)
🔮 १२ राशींचं भविष्य (Marathi Rashi Bhavishya)
♈ मेष:
🪙 आर्थिक लाभाची शक्यता
💔 प्रेमात अपयश संभवते.
⚠️ टिप: धाडस टाळा. संध्याकाळी मौल्यवान खरेदीचा योग.
♉ वृषभ:
🚗 वाहनसौख्य मिळेल.
💑 विवाह इच्छुकांना शुभवार्ता.
😊 टिप: आत्मविश्वास वाढविण्यासाठी शृंगार संगीत ऐका.
♊ मिथुन:
🛍️ आवडीच्या वस्तूंवर खर्च
👬 भावंडांकडून सहकार्य
✨ टिप: आज नवीन कल्पनांना वाव द्या.
♋ कर्क:
🏠 कौटुंबिक आनंद
😡 रागावर नियंत्रण ठेवा
🎁 टिप: एखादी अनपेक्षित भेट मिळू शकते.
♌ सिंह:
👩💼 महिला वरिष्ठांकडून कौतुक
💎 दागिने विक्रीस चालना
🔥 टिप: आत्मविश्वास वाढलेला राहील – महत्त्वाचे निर्णय घ्या.
♍ कन्या:
🚫 सकाळी अडथळे
🍽️ संध्याकाळी मेजवानीचे योग
🌅 टिप: नवीन लोकांशी संवाद वाढवा.
♎ तुळ:
💫 जुन्या नात्यांना संधी द्या
⚠️ मोहात न पडणे महत्त्वाचे
🧘♀️ टिप: ध्यान करा, संतुलन साधा.
♏ वृश्चिक:
🏆 कार्यक्षेत्रात यश
💍 विवाहासाठी योग्य दिवस
💡 टिप: महिलांकडून मार्गदर्शन घ्या.
♐ धनु:
🧳 प्रवासात थकवा
👨💼 नेतृत्वाची संधी
🚫 टिप: व्यसनांपासून दूर राहा.
♑ मकर:
😞 सकाळी थोडी निराशा
🎨 कला आणि संगीत यामध्ये प्रगती
🎯 टिप: संध्याकाळी मन:शांती मिळेल.
♒ कुंभ:
💼 आर्थिक स्थैर्य
🛑 विरोधकांपासून सावध
📉 टिप: पुढील दोन दिवस कामाची गती संथ राहील, संयम ठेवा.
♓ मीन:
🎤 गायक व कलाकारांसाठी उत्तम काळ
💢 विनाकारण भांडण टाळा
🌈 टिप: संवादात नम्रता ठेवा, यश मिळेल.
१ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवी, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही आयुष्यात प्रगती करतात आणि यश संपादन करतात. आयुष्यात बरेचसे चमत्कारिक आणि साहस पूर्ण अनुभव येतात. तुमच्यात जबरदस्त राष्ट्रभक्ती असते आणि घर आणि संसार याकडे तुमचा ओढा असतो. तुम्ही शांत वृत्तीचे असून एकलकोंडे आहात मात्र तरीही तुम्हाला लोकप्रियता मिळते. तुम्ही निस्वार्थी आणि प्रामाणिक असून पैसे जमवण्याकडे तुमचा कल असतो. मात्र पैशांमुळे तुम्हाला सुरक्षित वाटते. तुम्ही धार्मिक आहात. स्वतंत्र वृत्तीचे आहात. जीवनात सतत बदल करण्याची तुमची वृत्ती असते. एकाच गोष्टी तुम्ही फार काळ रमत नाहीत. तुम्ही उद्योगप्रिय असून सतत कामात मग्न असतात. तुमचा दृष्टिकोन डोळस असतो. इतरांना सल्ला देणे तुम्हाला आवडते आणि त्यात यश मिळते. तुम्ही व्यवहार दक्ष आणि ध्येयवादी असतात. तुम्हाला कलेबद्दल आकर्षण आहे. आणि तुम्ही त्यात उत्साहाने भाग घेतात. तुमची इच्छा शक्ती चांगली आहे. कोणताही विषय तुम्ही मित्रांना उत्तमपणे समजावून सांगू शकतात. तुमचा स्वभाव अस्थिर असल्यामुळे तुम्ही एकाच नोकरीत किंवा व्यवसायात फार काळ टिकत नाहीत.
व्यवसाय:-जाहिरात उद्योग, वर्तमानपत्रे, मासिके, चित्रपट उद्योग, नाट्यकला, रंगकाम, अंतर्गत सजावट, नेपथ्य, बँकिंग यात तुम्हाला यश मिळते. विद्युत क्षेत्र, संशोधन, सराफ व्यवसाय, शल्य विशारद.
शुभ दिवस:-रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार.
शुभ रंग:– पिवळा, सोनेरी, केशरी.
शुभ रत्न:- माणिक, पाचू, चंद्रमणी.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
📞 विशेष कुंडली परीक्षण व मार्गदर्शनासाठी संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
