आजचे राशिभविष्य मंगळवार, २१ ऑक्टोबर २०२५
२१ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
🪔 अश्विन अमावस्या – लक्ष्मीपूजन (दिवाळी अमावस्या)
📅 विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
🌙 अमावस्येला शुभ दीपोत्सव दिन
राहुकाळ – दुपारी ३.०० ते ४.३०
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या/तूळ. (विष्काम्भ योग, नाग किंवा किंस्तुघ्न करण शांती)
नक्षत्र – चित्रा/स्वाती.
२१ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर शुक्र आणि गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही प्रेमळ असून संसार, पत्नी आणि लहान मुलांबद्दल विशेष आस्था असते. उत्साह दांडगा असून प्रवासाची आवड असते. आयुष्यात उशिराने प्रतिष्ठा लाभते. तुमच्याभाववती एकप्रकारचे वलय असून लोकांना आकर्षित केले जाते. तुमचा ओढा सुखासीन जीवनाकडे असतो. तुम्हाला आयुष्यात सहजपणे मान- सन्मान मिळतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात मात्र त्यातून तुम्हाला अपेक्षाभंग मिळतो. तुमच्याशब्दात आणि कृतीत ठामपणा असतो. वायफळ बडबड तुम्हाला आवडत नाही. विवाहानंतर भाग्योदय होतो. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला प्रिय आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा आहे. धर्माचा तुम्ही डोळसपणे अभ्यास करतात. तुम्ही न्यायप्रेमी आणि इतरांच्या साठी कष्ट घेणारे आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यात रुबाबदारपणा, काटेकोरपणे आणि व्यवस्थितपणा आहे. दुर्बल लोकांना तुम्ही नेहमीच मदत करतात. तुमच्यामध्ये अनेक कौशल्य आहेत. क्रीडा प्रकारांची तुम्हाला आवड आहे. हाती घेतलेल्या कार्यासाठी तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे आणि जीवनाकडे तुम्ही आशादायकपणे बघतात. स्वतःच्या प्रेमसंबंधांंबाबत तुम्ही आशादायी आणि संयमी असतात. प्रेमात तुम्ही सावधपणे पाऊल टाकतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार असून आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर तुम्ही यशस्वीपणे मार्ग काढू शकतात. भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. वडिलोपार्जित समपट्टीत तुम्हाला वाटा मिळतो. इतरांना तुम्हीयोग्य सल्ला देतात. तुमच्यात आध्यत्मिक शक्ती असते.
व्यवसाय:- राजकीय क्षेत्र, मंत्री, न्यायाधीश, सचिव, शैक्षणिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, अमेठीस्ट, लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
🎆 दीपावली विशेष संदेश:
आजची अमावस्या ही नकारात्मकतेचा अंत आणि नव्या तेजस्वी सुरुवातीचे प्रतीक आहे. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या कृपेने आजचा दिवस धन, सौख्य आणि मंगलतेचा आहे. संध्याकाळी दीप प्रज्वलन व लक्ष्मीपूजन अवश्य करा. 🌼
♈ मेष:धनप्राप्तीचे उत्तम योग. घरात आनंद आणि मंगलमय वातावरण. संध्याकाळी लक्ष्मीपूजनात सहभागी व्हा. शुभ रंग — लाल.
♉ वृषभ:घरगुती आनंद वाढेल. आर्थिक लाभ आणि नवीन वस्तू खरेदीसाठी शुभ दिवस. नातेवाईकांशी प्रेम वाढेल.
♊ मिथुन:व्यवसायात यशाचे संकेत. लक्ष्मीपूजनामुळे धनवृद्धीचे योग. नातेवाईकांशी सुसंवाद राहील.
♋ कर्क:घरात मंगल कार्याची चाहूल. नवीन कामाच्या संधी. संध्याकाळी दीपदानाने मानसिक समाधान मिळेल.
♌ सिंह:सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक दृष्ट्या लाभ. देवी लक्ष्मीची विशेष कृपा लाभेल. शुभ रंग — सोनेरी.
♍ कन्या:आनंददायी वातावरण. नोकरीत प्रगती. आजच्या दिवशी केलेले कार्य दीर्घकाळ लाभदायी ठरेल.
♎ तुळ:कौटुंबिक सौहार्द वाढेल. नवीन वस्तू खरेदीसाठी शुभ वेळ. संध्याकाळी पूजनात लक्ष्मी मंत्र जपा.
♏ वृश्चिक:आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ. आर्थिक लाभ, कीर्ती, आणि आनंद लाभेल. घरात शांतता आणि सौंदर्य वाढेल.
♐ धनु:लांब प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यावसायिक प्रगती. लक्ष्मीपूजनात केशरी फुलांचा वापर लाभदायी.
♑ मकर:आज धनलाभाचा योग. जुनी देणी मिळतील. पूजा आणि ध्यानासाठी उत्कृष्ट वेळ. शुभ रंग — हिरवा.
♒ कुंभ:नवीन सुरुवातीसाठी योग्य दिवस. देवदेवतांच्या पूजनाने शुभता वाढेल. घरात आनंद आणि समृद्धी येईल.
♓ मीन:धन,वैभव आणि समाधानाचा दिवस. संध्याकाळी लक्ष्मी अर्चनेत पांढऱ्या फुलांचा अर्पण करा. यश निश्चित.
🕉️ आजचा उपाय (दीपावली विशेष):
संध्याकाळी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावा. देवी लक्ष्मीला पांढरी साखर आणि कमळ अर्पण करा.
मंत्र — “ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः” ११ वेळा जपा. 🌺
✨ आजचा संदेश:
“अंध:काराचा अंत करून प्रकाशाचा जयजयकार करा. अंतर्मनातील दीप प्रज्वलित ठेवा — तेच खरे लक्ष्मीपूजन आहे.”
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य मंगळवार, २१ ऑक्टोबर २… […]