आजचे राशिभविष्य मंगळवार, ७ ऑक्टोबर २०२५ 

७ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन कृष्ण प्रतिपदा. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. 
राहुकाळ –  दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०.
आज क्षय तिथी आहे. *कार्तिक स्नान आरंभ* 
चंद्रनक्षत्र – रेवती. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.  (ध्रुव, व्याघात योग)
७ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर नेपच्यून आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमचे ध्येय अत्यंत उच्च असतात. परंपरागत प्रथांबद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांचा अनुभव घेतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून व्यवहारात त्याचा उपयोग होतो. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला हौस असते. तुम्हाला क्रीडा, प्रवास, संगीत याची आवड असून तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात आणि दुरदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही सर्वसाधारण किंवा तुमच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसांमध्ये मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकांसोबत वेळ घालवणे तुम्हाला आवडते. तुम्हाला स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही संशयी असून प्रत्येक गोष्टीची खात्री झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्व नियोजन करतात. तुमच्यामध्ये दुरदर्शीपणा आणि व्यापारी वृत्ती असते. मनाने तुम्ही मोकळे असून तुमच्या कृतीमध्ये मुक्तपणा आहे मात्र तुमचे मन कायम अस्वस्थ असते.
व्यवसाय:-  आयात निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल, वैद्यकीय क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, हिरवा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- पाचू, मोती, पुष्कराज, लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज फारसा अनुकूल दिवस नाही. आज मोठे निर्णय घेऊ नयेत. मन भ्रमित होण्याची शक्यता आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. खर्च वाढणार आहे. अति धाडस नको.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र ग्रहमान आहे. चंद्र अनुकूल आहे. आज बँकेची आणि कर्जाची कामे रेंगाळतील. जुनी देणी द्यावी लागतील. मात्र आज मन उत्साही असणार आहे.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दशम चंद्र आज कामाचा ताण वाढवणार आहे. विशेषतः कॉमर्स संबंधित कामे वाढतील. शिक्षकांना अधिक मेहनत करावी लागेल. अन्यथा पालकांच्या नाराजीचा सामना करावा लागेल. आज देणी देऊन टाका. कर्जे परतफेड करा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. आज काहीतरी तुफानी करण्याची लहर येईल. मात्र अति धाडस नको. गुरुची नाराजी आहेच. हातून कोणतेही अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या. शकायटो कोणालाही दुखवू नका.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अष्टम स्थानी चंद्र आहे. आज अनुकूलता नाही. महत्वाची कामे आज शक्यतो पुढे ढकला. मोठे करार नकोत. तुम्हाला आज मनाची प्रसन्नता लाभणार आहे. पत्नीकडून लाभ होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्या राशीतील सूर्याची आज सप्तम स्थानातील चंद्राशी प्रतियुती आहे. तुमच्या मांविरुष काही घटना घडू शकतात. तुम्हाला आज कर्तव्याला अधिक महत्व द्यावे लागेल. आळस झटकून कमला लागावे लागेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज व्यवसायिक कमाई वाढणार आहेत. आर्थिक लाभ उत्तम होणार आहेत. कुलदेवतेची स्मरण आज जरूर करा. धार्मिक कार्य घडेल. त्यासाठी खर्च कराल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) पंचम स्थानी चंद्र आहे. सूर्याची अनुकूलता आज कमी जाणवेल. राजकीय क्षेत्रात जपून वाटचाल करा. वेळ प्रसंगी माघार घेणे हिताचे आहे. तुमच्या बुद्धिमत्तेचा आज आदर होईल.
 धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सप्तम गुरुशी चंद्राचा केंद्र योग आहे. स्वतःच्या राहत्या वास्तूमध्ये काही दोष जाणवू शकतो. घाट किंवा राहत्या वास्तूमध्ये काहीही चुकीचे काम होणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायाचा ताण आज वाढणार आहे मात्र एखादा चुकीचा आर्थिक निर्णय होऊ शकतो.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) जुनी आणि रखडलेली कामे आज पूर्ण होतील. त्यासाठी चिकाटी आणि सातत्य दाखवावे लागेल. एखाद्या जुन्या मित्राची मदत होऊ शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. चोरीचे भय आहे. मौल्यवान वस्तू सांभाळा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आज संततीशी मतभेद संभवतात. अजूनही तुम्ही वारसा हक्काच्या कामाकडे लक्ष दिले असेल तर आज त्याची दखल घ्या. मात्र शांततेने आणि संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. अष्टम सूर्याची नाराजी आहे त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्या.
मीन:– (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आज तुमचं राशीत चंद्र असून सप्तम स्थानातील सुर्यशी प्रतियुती आहे. कर्तव्य आणि भावना यात मन दोलायमान होईल. तुम्हाला आज एखादा निर्णय घेणे जड जाईल. चतुर्थ गुरू घरगुती कामासाठी वेळ द्यायला लावेल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!