आजचे राशिभविष्य मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५
१६ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद कृष्ण दशमी. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०.
आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
चंद्रनक्षत्र – आर्द्रा/(सकाळी ६.४६ नंतर)पुनर्वसू.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन. (वरीया योग, विष्टी करण शांती करून घेणे)
१६ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर बुध आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव विनोदी असून तुम्ही मनाने उदार आहात. प्रकृतीबाबत तुमचे सतत कुरबुर चालू असते. वैवाहिक जीवनात काहीतरी न्यून जाणवत असते. वरून तुम्ही शांत दिसत असला तरी मनात सदैव खळबळ चालू असते. त्यामुळे अनेकदा थोडासा रागीटपणा वाढतो. इतरांची लुडबुड आणि ढगाढवळ तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही नम्र आणि विनायशील असून स्वतःच्या अधिकाराचा बडेजाव करत नाहीत. तुमच्या वागण्यामध्ये सावधगिरी असते. तुम्हाला विश्रांतीची गरज असते. कामाबाबत अभ्यासु वृत्ती आणि पद्धतशीर पणा असतो. रहस्य कथा आणि विनोदी चित्रपट तुम्हाला आवडतात. दुसऱ्याच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून बारीक-सारीक गोष्टी सुद्धा तुमच्या लक्षात राहतात. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतात. तुमचे ध्येय आणि महत्त्वाकांक्षा उच्च प्रतीचे असतात. परंपरागत रुढीबद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. मैदानी खेळ आणि प्रवास यांची आवड असते. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगणे तुम्हाला आवडते. तुम्ही चटपटीत असून तुम्हाला आळशी पण आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व प्रज्ञान आणि अधिकार यांची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुमची वृत्ती साशंक असते आणि खात्री झाल्याशिवाय तुम्ही कोणावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. तुमच्यामध्ये धूर्त व्यापार वृत्ती असते. तुम्ही तुमचा अहंकार जोपासतात. मनाने तुम्ही मोकळे असून कृतीत मुक्तपणा असावा असे तुम्हाला वाटते. तुम्ही अस्वस्थता निर्माण करणाऱ्या भावनांना आवर घातला पाहिजे कारण तुमच्याकडून इतरांना स्फूर्ती मिळते.
व्यवसाय:- दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक, वैद्यकीय क्षेत्र, आयात निर्यात, परदेशाशी संबंधित व्यवसाय.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार.
शुभ रंग:– पिवळा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, मोती आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)(Marathi Rashi Bhavishya)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा रवीशी शुभ योग तर गुरुशी युती आहे. अनुकूल ग्रहमान आहे. आज रखडलेली कामे पूर्ण करा. तुम्ही मुळात धाडसी आहात. आज मोठा पराक्रम कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. प्रेमात यश लाभेल. कोर्टात महिला न्यायाधीश असल्यास तुम्हाला अनुकूलता वाढेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) ग्रहमान अनुकूल आहे. व्यवसाय वाढेल. मनासारख्या घटना घडतील. घरातील साफसफाई आणि काही बदल करण्यासाठी चांगला दिवस आहे. हरवलेली वस्तू सापडेल. संकट टळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आज तुमच्या राशीत चंद्र गुरू युती आहे. मन आनंदी राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मनासारखी कामे होतील. सौरयाची अनुकूलता आहे. तुमचे वर्चस्व राहील. आर्थिक आवक चांगली होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) व्यय स्थानी चंद्र आहे. काही मनासारखी कामे पार पडतील. दानधर्म करण्यास तुम्ही आज उत्सुक असाल. महत्वाच्या कामासाठी पैसे खर्च कराल. कर्ज असल्यास ते फेडले जाईल. मेजवानी मिळेल. कलाकारांना चांगला दिवस आहे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) लाभ स्थानी चंद्र आहे. तुमच्या राशीतील राशीस्वामी सूर्याची अनुकूलता आज वाढणार आहे. अडचणी दूर होतील. एकूणच आज अत्यंत आनंदी दिवस आहे. नात्यातून लाभ होतील. येणी वसूल होतील. व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आज प्रणय रम्य दिवस आहे.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दशम स्थानी चंद्र आहे. व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. नोकरीत मन लागेल. काही आनंददायक घटना घडतील. अर्थकारण सुधारेल. महिलांकडून लाभ होतील. संपत्ती वाढेल. वरिष्ठ खुश राहतील. तुमची कीर्ती पसरेल आणि प्रशंसा होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चंद्र तुमच्या नवम स्थानात आहे. मन धार्मिक विचारांनी भरून जाईल. तीर्थाटन करावेसे वाटेल. सत्संग लाभेल. भाग्य उजळेल. आवडत्या वस्तूंचा लाभ होईल. प्रसंगी कठोर भूमिका घ्याल. स्वार्थी मित्रांपासून आज दूर व्हाल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अष्टम स्थानी चंद्र आहे. तुम्ही फारसे धार्मिक नसतात. पण आज तुम्हाला एखाद्या कार्यासाठी वेळ काढावा लागेल. त्यातून मानसिक समाधान देखील लाभेल. कामाच्या ठिकाणी महिलांकडून सन्मान आणि सहकार्य मिळेल. वरिष्ठ व्यक्तींसाठी मात्र खर्च करावा लागेल. त्यातून पुढे लाभ होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सप्तम स्थानी चंद्र आहे. मन आनंदी राहील. कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून सहकार्य लाभेल. महत्वाची कामे आज मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शेअर्स मधून लाभ होतील. शत्रू आश्चर्यकारकरित्या माघार घेतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) षष्ठ स्थानी चंद्र आहे. अनुकूल दिवस आहे. परदेश गमनाचे योग आहेत. सासुरवाडीकडून लाभ होतील. नोकरीत नेहमीची कामे पूर्ण होतील. अधिकार वाढतील. अन्य मार्गाने अर्थप्राप्ती होणार आहे. दानधर्म केल्यास अधिक पुण्य पदरी पडेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या पंचम स्थानी चंद्र गुरू युती आहे. ही ग्रहस्थिती अत्यंत लाभदायक आहे. संतती कडून चांगली बातमी समजेल. शेअर्स मधून लाभ होतील. आर्थिक आवक वाढेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्याल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. लक्ष्मी प्रसन्न होईल. अचानक लाभ होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या चतुर्थ भावात चंद्र आहे. मन आनंदी राहील. महत्वाची कामे आज पूर्ण होतील. वास्तूचे स्वप्न पूर्ण होण्यास आज हातभार लागेल. महत्वचे निर्णय होतील. आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. नैतिकता सोडू नका.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
