आजचे राशिभविष्य मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५
२३ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन शुक्ल द्वितीया. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०.
आज उत्तम दिवस आहे.
चंद्रनक्षत्र – हस्त/(दुपारी १.४० नंतर) चित्रा .
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
२३ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्ही महत्वाकांक्षी आहात. तुमच्या विषयाची सखोल माहिती घेतात. तुम्ही कायदाप्रेमी आहात. तुम्ही व्यावहारिक आणि ध्यात्मिक असून शांतताप्रिय आहात. तुम्हाला संगीत, वाङ्मयीन वाचन, प्रवास यांची आवड असते. तुमच्याकडे चांगले शब्दभांडार असते. त्याचाभाषण, लेखन यात उपयोग होतो. मोठेपणा, प्रतिष्ठा, प्रशंसा यास तुम्ही अधिक महत्व देतात. तुम्ही इतरांची परीक्षा चांट्कन आणि नेमकी करू शकतात. मनाने दुर्बल लोकांवर तुम्ही विजय मिळवतात. तुम्ही दिसायला चांगले असून अत्यंत लोकप्रिय आहात. भिन्न लिंगी व्यक्तिमध्ये तुम्ही प्रिय असतात. तुम्ही इतरांना सहसा दुखावत नाहीत. कमी बोलणे तुम्हाला हिताचे वाटते. तुम्ही सहसा स्वतःची गुपिते इतरांना सांगत नाहीत. तुमची निरीक्षणशक्ती उत्तम आहे. तुम्हाला कोडी सोडवणे, लॉटरी, शेअर्स यांचा नाद असतो. लहान वयात एखादे प्रेमप्रकरण संभवते. तुम्ही तुमच्या भावनांवर ताबा ठेवू शकतात. व्यावसायिक यश चांगले मिळते. गूढ विद्याची तुम्हाला आवड असते मात्र त्यासाठी अभ्यासाचे कष्ट घेण्याची तयारी नसते. तुमचा विवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो आणि विवाहानंतर भाग्योदय होतो. तुम्ही अत्यंत बुद्धिवान, धूर्त, जलद काम करणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. तुम्ही उदार आणि विशाल मनाचे असून इतरांचा आदर आणि कदर करतात. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. तुमचे व्यक्तिमत्व चटपटीत आणि प्रसन्न आहे. तुमच्यात समजूतदार पण असतो. स्वतःचे विचार मित्रांना समजून सांगण्याची हौस असते. तुमचे उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला माहीत असतं आणि त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे
व्यवसाय:- वकील, मेडिकल, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, मेडिकल स्टोअर्स, अकाउंट, पॅथॉलॉजी, स्टॅटिस्टिक.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पाचू आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) षष्ठ स्थानी चंद्राचा गुरुशी केंद्र योग आहे. संमिश्र ग्रहमान आहे. कामाचा ताण वाढणार आहे. आज एखादे धाडसी काम करावेसे वाटेल. अंगात उत्साह संचारेल. मात्र त्यास आवर घालावा लागेल. वजन वाढण्याचा संभव आहे. लेखन करताना काळजी घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमचा नावलौकिक वाढेल. कर्जे मंजूर होतील. दूरच्या देशात जाण्याचे बेत ठरतील. मौल्यवान वस्तू खरेदीचा विचार कराल.
मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) बऱ्याच दिवसांपासून घरावर खर्च करावा, घरात काही बदल करावेत असे तुमच्या मनात आहे. आज त्याची कार्यवाही होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक बाबतीत सावधान रहा. मोबाईल वरील पेमेंट बाबतीत घोटाळा होऊ शकतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) देवासाठी किंवा धर्मासाठी खर्च कराल. नेहमीपेक्षा नवीन काहीतरी कल्पना आज राबवली जाईल. धाडसी निर्णय घ्याल. त्यास घरातल्या लोकांची साथ लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) एखाद्या सिद्ध पुरुषाचा किंवा साधुचा सत्संग लाभेल. मात्र तुम्हाला त्याला ओळखता आले पाहिजे. भौतिक सुखे आणि अध्यात्म यात मन दोलायमान होईल.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. बौद्धिक क्षेत्र, गणित यात चातुर्य दाखवाल. नोकरीत विशेष नैपुण्य प्राप्त होईल. मात्र अपेक्षित सहकार्य आज मिळणार नाही.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज मनाची अस्वस्थता अनुभवास येईल. काहीतरी कारणाने हुरहूर लागून राहील. दुरहच प्रवास करावासा वाटेल. आज तुम्हाला उपासनेची गरज आहे. कुलदेवतेची पूजा करा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चंद्र अनुकूल आहे मात्र गुरुची अनुकूलता नाही. मध्यम स्वरूपाचा दिवस आहे. व्यय स्थानी मंगळ तुमच्या खर्चात वाढ करणार आहे. कधीकधी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी खर्च करावा लागतो. आज तुमच्या क्रोधामुळे नुकसान संभवते.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज तुमच्या विरोधातील लोकांच्या दबावाने अधिक काम करावे लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी उशिरापर्यंत थांबावे लागू शकते. सहकाऱ्यांचा प्रभाव जाणवेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) काही दुःखांचे मूळ हे मानसिक अस्वस्थतेत असते. आज मानसिक आरोग्य सांभाळावे लागेल. प्रवास घडतील. मात्र नियोजनात बदल होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या अष्टम स्थानी चंद्र आहे. काही अप्रिय अनुभव येतील. मन विनाकारण अस्वस्थ राहील. संततीबाबत काही काळजी वाटणाऱ्या घटना घडू शकतात. प्रवासाचे नियोजन बदलेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या चतुर्थ स्थानी गुरू तर सप्तम स्थानी चंद्र आहे. घरात अधिक लक्ष द्यावे लागेल. शेतीच्या कामांबद्दल चिंता वाटू शकते. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरू शकतो. वास्तूची कामे पुढे ढकलली जातील.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
