ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक,Marathi Rashi Bhavishya
श्रावण कृष्ण चतुर्थी/पंचमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज क्षय तिथी आहे”
नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा. (सकाळी १०.३३ नंतर ) रेवती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन. (धृती योग शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
Marathi Rashi Bhavishya
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र व्यय स्थानी आहे. मात्र रवीशी शुभ त्रिकोण योग आहे. नवीन संधी चालून येतील. राजकीय विरोधक माघार घेतील. स्थावर संपत्ती वाढेल. मात्र गुरुशी आणि शुक्राशी केंद्र योग असल्याने अहंकार ‘न’ टाळल्यास काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खर्चात वाढ संभवते. चैनीवर खर्च होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल चंद्र आहे. आनंदी राहाल. कलाकारांना यश मिळेल. स्वप्ने साकार होतील. शौर्य गाजवाल. महत्वाचे निर्णय आज घेतले जातील. गायकांना उत्तम लाभ होतील. उधारी, कर्जे घेणे आज टाळावे.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कला प्रांतात उत्तम नावलौकिक होईल. प्रसन्न ग्रहमान सर्व स्वप्ने साकार करतील. नोकरीत सुखद अनुभव येतील. मित्र मंडळी भेटतील. स्वतःच्या आनंदावर खर्च कराल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) समाधानकारक कालावधी आहे. अनुकूल चंद्र रवी योग नावलौकिक आणि सरकार दरबारी वजन वाढवतील. कामे मार्गी लागतील. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. दानधर्म घडेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. मनात अशांती निर्माण होऊ शकते.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायात वाढ होईल. भौतिक सुखे प्राप्त होतील. समाधानी राहाल. सहकार्य मिळेल. अनुकूल रवी सरकार दरबारी तुमची अडकलेली कामे पूर्ण करेन. क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक प्रगती होईल. संधी प्राप्त होतील. नोकरीत उत्तम अनुभव येतील. वरिष्ठ खुश राहतील. बढती मिळेल. तीर्थाटन घडेल. मात्र प्रसिद्धीच्या मागे लागू नका.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. पंचम स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक लाभ होतील. धर्म कार्य कराल. अचानक लाभ होतील. उच्च स्थानी जाल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सामाजिक संबंध मजबूत होतील. नवनवीन योजना पार पडतील. सन्मान मिळतील. धाडसी निर्णय घ्याल. भागीदारी व्यवसायात काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. पत्नीची नाराजी ओढवून घेऊ नका.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक प्रगती साध्य होईल. येणी वसूल होतील. आर्थिक चिंता मिटतील. प्रतिस्पर्धी माघार घेतील. आरोग्य सांभाळावे लागेल. व्यसने टाळा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या द्वितीया स्थानी चंद्र आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायाच्या नवीन संधी प्राप्त होतील. क्षितिजे उंचावतील. राजकीय पदे/ उच्च पदे मिळतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. आध्यत्मिक प्रगतीस अनुकूल कालावधी आहे. पंचम रवी तुमची स्वप्ने साकार करतील. काही घरगुती प्रश्न निर्माण होतील.
१३ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये🙁Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर हर्षल, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही हुशार असून तुमच्यात आपुलकीची भावना आहे. तुम्हाला शास्त्रीय पुस्तके आणि वाङ्मयीन वाचनाची आवड आहे. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. इतरांना तुमचा स्वभाव आणि सहवास मनापासून आवडतो. तुम्ही धोक्यांना सहजपणे तोंड देतात.तुम्ही उंच, दिसायला चांगले असून बुद्धिमान आणि हुशार लोकांमध्ये राहणे आवडते. तुमचा स्वभाव आटोपशीर आहे. आयुष्यात यश आणि कीर्ती झटपट मिळावी अशी अपेक्षा असते. आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान आहात. दृष्टीकोन व्यावहारिक असतो. इच्छाशक्ती तीव्र असते. धर्मादाय संस्था, अपंग संस्था यांसाठी काम करणे आवडते. भिन्न लिंगीव्यक्तीबद्दल जबरदस्त आकर्षण असते. स्वतःच्या कल्पना इतरांच्या मदतीने प्रत्यक्षात आणण्यात तुमचा हातखंडा असतो. तुमची शरीरयष्टी उंच असून डोळे सुंदर असतात. स्वभावात अस्थिरताअसते आणि काही वेळेस अकल्पनिय वागणे असते. भिन्न लिंगी व्यक्तींपासून तुम्हला फायदा होतो. कौटुंबिक जीवन सुखाचे असते.
आयुष्यातील ४० नंतर भाग्योदय होतो. पूर्वार्ध कष्टाचा असतो. प्रेमात अनेक अडथळे येतात. आयुष्यात काही असाधारण घटना घडू शकतात. जीवनात अनेक बदल घडतात मित्र, मैत्रिणी देखील बदलत राहतात. स्वभाव चिकित्सक आणि तर्कनिष्ठ आहे. शास्त्रीय पुस्तके, वाङ्मय, याची तुम्हाला आवड आहे. वयाच्या ३१ नंतर तुमचा भाग्योदय होतो. तुम्ही स्वभावाने गरीब दिसत असलात तरी आतून तुम्ही हट्टी असतात. विचाराने स्वतंत्र असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या राहतात असावी असे तुम्हाला वाटते. तुमच्या योजना तुम्ही काटेकोरपणेआखतात आणि त्यात तुम्हाला यश येते. धोक्यांना सामोरे जाणे तुम्हाला आवडते. तुमच्यात मोठेपणा आणि प्रतिष्ठा असते. व्यवसायात तुम्ही मोठ्या पदावर जातात. तुम्ही उंच आणि देखणे असतात. उत्साह जोमाने प्रगती हे तुमचे वैशिष्ट्ये आहेत. तुमचे आयुष्य अनेक चळवळींनी भरलेले आहे. तुम्हाला अनपेक्षित गोष्टींचा नेहमी अनुभव येतो. तुमच्या मनाची पातळी वरच्या दर्जाची आहे. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्ही तुमचे स्वतःचे विचार इतरांवर लादत असतात. तुम्ही वादविवाद टाळले पाहिजेत. त्यामुळे गुप्त शत्रू निर्माण होत असतात आणि गैरसमज पसरत असतात. तुम्हाला थेटर्स, सिनेमा आणि भ्रमंती याची आवड असते. तुम्ही हरहुन्नरी आहात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब आहे. आणि तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडतात मात्र ते तुमच्या चांगल्यासाठीच असतात. परंपरा, रूढी आणि बंधने तुम्ही तोडून टाकतात. तुमच्या मध्ये मनाचा एककल्लीपणा जाणवतो. तुम्ही इतरांपुढे संपूर्ण व्यक्त होत नाहीत मात्र सर्व प्रकारच्या अडचणींवर तुम्ही सक्षमपणे मात करतात. न आवडणाऱ्या गोष्टींचा तुम्ही जोरदार विरोध करतात. तुमच्या विचारांमध्ये आग्रहीपणा आणि अट्टाहास असतो. तुम्ही सतत कार्य मग्न असतात.
व्यवसाय:- यंत्रसामुग्री, विज्ञान, इलेक्ट्रिसिटी, वाहतूक यंत्रणा, इंजिनिअर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, संशोधन, कारखानदारी, हस्तसामुद्रिक, ज्योतिषी, अध्यात्म, बँकिंग सल्लागार.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शनिवार.
शुभ रंग:- निळा, पांढरा, मरून.
शुभ रत्न:- हिरा, पोवळे, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
