आजचे राशिभविष्य बुधवार, २० ऑगस्ट २०२५
२० ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
श्रावण कृष्ण द्वादशी/त्रयोदशी. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे” *प्रदोष*
नक्षत्र – पुनर्वसू.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन/ (संध्याकाळी ६.३५ नंतर) कर्क.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
Marathi Rashi Bhavishya
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राची शुक्राशी युती तर शनिशी त्रिकोण शुभ योग आहे. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल. प्रश्न सुटतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. कलाकारांना उत्तम लाभ होतील. अनेक दिवस अडलेली कामे आज पूर्ण होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आनंदी राहाल. गायकांना यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी उत्तम अनुभव येईल. शनी अत्यंत अनुकूल आहे. मोठी झेप घ्याल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आत्म विश्वास वाढेल. आवडती वस्तू खरेदी कराल. मेजवानी मिळेल. कला प्रांतात उत्तम नावलौकिक होईल. नोकरीच्या ठिकाणी उत्तम अनुभव येतील. मनासारखी कामे पार पडतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होणार आहे. आध्यत्मिक लाभ होतील. सिद्धी प्राप्त होतील. तीर्थयात्रा घडेल. पुढील घटनांचे सूचक मार्गदर्शन मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) चंद्र, शुक्र अनुकूल आहे. प्रगतीची घोडदौड चालू राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल. सामाजिक महत्व वाढेल. भौतिक सुखे प्राप्त होतील. वाहन खरेदी होऊ शकते.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. व्यवसायात भरघोस वाढ होईल. नोकरीत दबदबा वाढेल. कामे मार्गी लागतील. पुरुषांना महिलांकडून सहकार्य लाभेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. धन धान्य वाढेल. खरेदी होईल. सहकाऱ्यांमार्फत लाभ होतील. व्यवसाय वाढेल. कुलदेवतेची कृपादृष्टी राहील. आरोग्य सुधारेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. महत्वाच्या व्यक्तीची भेट होईल. प्रवास घडतील. अचानक धनलाभ होईल. मात्र आर्थिक नियोजन व्यवस्थित करा. काळजीपूर्वक पावले टाका.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कोर्ट कामात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. अर्थकारण मजबूत होईल. हाती घेतलेले काम तडीस न्याल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. अधिकार वाढतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. येणी वसूल होतील. आर्थिक चिंता मिटतील. कौटुंबिक सुख लाभेल. व्यसने टाळावीत.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक आवक वाढेल. भेटवस्तू मिळतील. नवीन खरेदी होईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. प्रेमात यश मिळेल. सौख्य लाभेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसायिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे. नवीन कराराची बोलणी यशस्वी होतील. गृह सजावट कराल. वाहन सुख लाभेल.
२० ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र आणि रवी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला भरपूर मित्र असतात आणि स्त्रियांपासून तुम्हाला फायदा होतो. तुम्ही लेखक म्हणून प्रसिद्धीस येतात. तुमचा भाग्योदय पाणथळ जागी होतो. लोकांच्या कल्याणाचा तुम्हाला ध्यास असतो. तुम्ही प्रेमळ आणि दयाळू आहात. तुम्हाला उपजतच वरच्या दर्जाची कल्पनाशक्ती आणि उच्च ध्येयवादअसतो. इतरांना तुमच्याबद्दल विलक्षण आकर्षण असते. समारंभात तुम्हाला मानाचा स्थान असते. सूक्ष्म आणि गूढ बाबींकडे तुमचा ओढा असतो. मनाची सूक्ष्म शक्ती तुमच्याजवळ असते. पुढे घडणाऱ्या घटना अनेकदा तुमहाला आधीच समजतात. आयुष्यात सर्वसाधारण यश मिळते. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. गुप्त शत्रूंपासून सावध राहिले पाहिजे. तुम्ही मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या उच्च प्रतीचे आहात. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या मध्ये जबरदस्त कल्पनाशक्ती आहे. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याची तुम्ही प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे रूपांतर करू शकतात. तुम्ही विचारी आहात आणि निस्वार्थी तसेच विचारवंत देखील आहात. इतरांच्या भावनांचे तुम्ही कदर करतात. तुम्ही एक उत्तम सहकारी असतात. कोणत्याही कामाचे तुम्ही उद्दिष्ट विसरत नाहीत. तुमच्या
व्यवसाय:- संगीतकार, कथालेखक, कादंबरी लिखाण, पेंटिंग्स, कविता, नाट्यकृती लिहिणे, द्रव पदार्थ संबंधित व्यवसाय, ज्योतिषी, केमिस्ट, प्रयोगशाळा संबंधित व्यवसाय, दंतवैद्य, बँकिंग, सर्जरी.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:– पांढरा, निळा, बिस्किटी.
शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
