आजचे राशिभविष्य बुधवार, ६ ऑगस्ट २०२५
६ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक Marathi Rashi Bhavishya
श्रावण शुक्ल द्वादशी/त्रयोदशी. विश्ववसूनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज चांगला दिवस आहे”
नक्षत्र – मूळ./पू. षा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु. (वैधुर्ती, कौल, विषपुत्र योग)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
Marathi Rashi Bhavishya
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरु आणि शुक्राशी प्रतियोग तर रवी शी देखील अशुभ योग आहे. लेखकांनी जपून लेखन करावे. तीर्थयात्रा घडेल. आध्यत्मिक उन्नतीसाठी चांगला कालावधी आहे. परदेशात जाऊ इच्छिणार्यांची फसगत होऊ शकते. मातेची काळजी घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. हसू आणि आसू यांचा संगम असणारा दिवस आहे. जुन्या आठवणीत रममाण व्हाल. कर्जे घेणे टाळा. आर्थिक चिंता सतावेल. कलाकारांना आज अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शेअजाऱ्यांशी वाद संभवतात.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्या सप्तम स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. मौल्यवान वस्तू खरेदी होईल. मन आनंदी राहील. भौतिक सुखाची ओढ वाटेल. मन दोलायमान होऊ शकते. प्रिय व्यक्तीची भेट होईल. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. पित्याशी मतभेद संभवतात.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) व्यावसायिक यश देणारा दिवस आहे. धाडसी निर्णय घ्याल. आर्थिक लाभ वाढतील. आरोग्य सांभाळावे. मनासारखा खर्च कराल. काही कामे अपेक्षे प्रमाणे होणार नाहीत यामुळे चिडचिड होऊ शकते. तुमच्या दयाळू स्वभावाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्यात नेतृत्वगुण आणि व्यावहारिकता आहे. आज त्याचा लाभ घ्या. तुमचे अंदाज अचूक ठरतील. कामाची गोडी लागेल. तुम्हाला थोडा देखीलअपमान सहन होत नाही. प्रतिष्ठा तुमच्यासाठी फार महत्वाची असते. मात्र आज तडजोड करावी लागेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)आज अनुकूल दिवस आहे. काहीसा आराम देणारा दिवस आहे. आनंद देणाऱ्या बातम्या समजतील. पूर्व कर्माचे फळ मिळेल. सूर्य अनुकूल आहे मात्रआज त्याचा फारसा फायदा होणार नाही. सरकारी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. महिलांचा गैरसमज होणार नाही याची कळजी घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यवसाय वाढीसाठी चांगला कालावधी आहे. आध्यत्मिक लाभ होतील. सरकारी नोकरीतील व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाचा ताण आज वाढणार आहे. तुमचे वरिष्ठ आज तुमच्यावर नाखूष राहू शकतात.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आज चाकोरी बाहेरचा दिवस आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. पित्याशी मतभेद संभवतात. वेगळ्या मार्गाने धन कमावण्याचा प्रयोग करू नका. पत्नीच्या नात्यातून आर्थिक लाभ होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज तूमच्याच राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील कुलदेवतेची कृपा राहील. अडचणी दूर होतील. व्यापार वाढेल. मात्र अपेक्षित लाभ मिळणार नाहीत. प्रिय व्यक्तीची नाराजी सहन करावी लागेल. महिलांशी वागताना विशेष काळजी घ्या. एखाद्या ठिकाणी द्वेषाचा सामना करावा लागू शकतो.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रतिकूल दिवस आहे. आज फारशी अपेक्षा ठेवू नका. विनाकारण खर्च वाढेल. हातून चुकीचे काम घडू देऊ नका. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतु शकतात. प्रलोभने आणि व्यसने टाळा. सरकारी यंत्रणेशी उगाचच वाद घालू नका. त्यात तुमचेच नुकसान होणार आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) चंद्र अनुकूल आहे. मात्र तरीही आजचा दिवस फारसा आशादायी नाही. काही उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. शेअर्समध्ये नुकसान संभवते. व्यावसायिक अंदाज चुकू शकतात. प्रिय व्यक्तीकडून अपेक्षभंग होईल. प्रतिष्ठा, अब्रू यांचा विचार करावा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सध्या साडेसाती चालू आहे. नोकरीच्या ठिकाणी काहीसे अस्वस्थ वातावरण आहे. संयम ठेवावा लागेल. घर, वाहन यांच्यावर खर्च होऊ शकतो. अहंकार बाजूला ठेवून आज काम करावे लागेल. प्रवास घडतील. मात्र त्यात बदल संभवतात.
६ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही प्रेमळ आहात तसेच कलाकार आणि कला प्रिय देखील आहात. तुमच्या वागण्यात, बोलण्यात एक प्रकारचा आकर्षकपणा आणि मोहक पण आहे. इतरांना तुमच्याबद्दल आकर्षण वाटते. रूढी परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना जरा वेगळा असून इतरांना त्या लवकर समजत नाहीत. तुमची वृत्ती खर्चिक आहे. तुमचे आयुष्य आरामदायक, श्रीमंत, आनंदात जाते. इतरांच्या आदरास तुम्ही पात्र असतात. तुमचे मन विशाल आहे. व्यवसायामध्ये तुम्ही उच्च पदावर जातात. सिनेमा नाटक यांचे तुम्हाला आवड आहे. तुम्हाला जर मान सन्मान मिळाला तर तुम्ही खुश होतात आणि अधिक चांगले नेतृत्व करतात. इतरांनी कौतुक ‘न’ केल्यास तुमचा विरस होतो. तुम्ही अत्यंत अभ्यासू वृत्तीचे आहात. वृत्तीने तुम्ही गंभीर असतात आणि तुमचा मित्रपरिवार फार जास्त नसतो. आयुष्यात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत राहते. तुम्ही उत्साही आणि महत्त्वाकांक्षा असून तुमच्या कामात सातत्य आहे. अहंगंड आणि इतरांवर स्वतःची मते लादणे टाळावे.
व्यवसाय:- गृह सजावट. दागिने विक्री, संगीतज्ञ, हॉटेल मॅनेजर, मिठाईचा व्यवसाय, जमीन खरेदी विक्री, तयार कपडे, कॉस्मेटिक्स, सुवासिक अत्तरे.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी.
शुभ रत्न:- पाचू, मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य बुधवार, ६ ऑगस्ट २०२५ […]