
–ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
📅 मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी/सप्तमी
🗓️ शके १९४७ – संवत २०८२
🌙 चंद्र – सिंह राशीत, मघा नक्षत्रात
⚠️ आज वैधरुती वर्ज्य दिवस
🔱 योग: चंद्र केंद्र बुध, चंद्र केंद्र हर्षल.
मघा नक्षत्रातील सिंह चंद्र आज अहंभाव, नेतृत्वगुण, ठाम निर्णयशक्ती वाढवतो. पण ‘वर्ज्य’ असल्याने महत्त्वाचे नवीन उपक्रम, करार, प्रवास टाळावेत. चंद्राच्या बुध आणि हर्षल केंद्र संबंधामुळे अचानक बातम्या, झटपट निर्णय, अनपेक्षित बदल दिसू शकतात.(Marathi Rashi Bhavishya)
🐏 मेष (Aries)-आज धाडस वाढेल, पण अचानक योजना बदलण्याची शक्यता. कामात घाई करू नका. वाहन वा प्रवास टाळा. वरिष्ठांशी संवाद सावध.
🐂 वृषभ (Taurus)-गृहकार्यात बदल घडू शकतो. कुटुंबात एखाद्या गोष्टीवर अचानक चर्चा होईल. पैशांच्या बाबतीत मोजून पाऊल टाका.
👥 मिथुन (Gemini)–बुध केंद्र योगामुळे संवाद जोरात राहील. पण हर्षल मुळे विचारांत अस्थिरता. महत्त्वाचे निर्णय आज पुढे ढकला. लिखाण, व्यवहारात काळजी.
🦀 कर्क (Cancer)–पैशांचे उतार-चढाव. घरातील खर्च वाढेल. नोकरीत अचानक बदलांचा विचार येईल. आरोग्य थोडे ढासळू शकते, विश्रांती घ्या.
🦁 सिंह (Leo)-चंद्र स्वतःच्या राशीत, आत्मविश्वास प्रबळ. पण मघा नक्षत्रामुळे “मी” वृत्ती वाढेल. वर्ज्य असल्याने वाद टाळा. अचानक भेटी किंवा बातम्या मिळतील.
🌾 कन्या (Virgo)-मनात अस्वस्थता. जुन्या गोष्टी आठवतील. बुध केंद्र योगामुळे अंतर्ज्ञान चांगले काम करेल, पण कार्य निष्कर्ष उद्या काढा.
⚖️ तुला (Libra)-–मित्रांकडून अचानक संपर्क. योजना बदलण्याची शक्यता. आर्थिक व्यवहार आज थांबवा. सामाजिक कामात नाव मिळेल.
🦂 वृश्चिक (Scorpio)–कामात अनपेक्षित जबाबदारी येईल. वरिष्ठांशी मतभेद होऊ नयेत याची काळजी घ्या. निर्णय उद्या घ्या. प्रतिष्ठेची काळजी घ्या.
🏹 धनु (Sagittarius)–प्रवासाची योजना असेल तर पुढे ढकला. अभ्यासात लक्ष विचलित होईल. नवे ज्ञान मिळेल पण त्याचा वापर उद्या करा.
🪐 मकर (Capricorn)–आर्थिक गोष्टीत अचानक बदल. कर्ज, गुंतवणूक टाळा. संबंधांमध्ये स्पष्टता ठेवा. भावनिक चढ-उतार संभव.
🌊 कुंभ (Aquarius)–जोडीदाराशी अचानक चर्चा किंवा गैरसमज. हर्षल केंद्र योग तुमच्यावर जास्त प्रभाव करेल. अचानक निर्णय घेऊ नका.
🐟 मीन (Pisces)–कामाच्या ठिकाणी अडथळे. आरोग्याची काळजी घ्या. उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. ध्यान, शांतता लाभदायक
.(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव‘ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)





[…] आजचे राशिभविष्य बुधवार, १० डिसेंबर २०… […]