आजचे राशीभविष्य – बुधवार, २३ जुलै २०२५
२३ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये
ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
🔷 दिनविशेष
आषाढ कृष्ण चतुर्दशी | शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसु नाम संवत्सर | दक्षिणायन
शिवरात्री आणि संत सावता माळी पुण्यतिथी
📿 आज वर्ज्य दिवस आहे
🔸 राहुकाळ – दुपारी १२:०० ते १:३०
🔸 नक्षत्र – आर्द्रा (संध्याकाळी ५:५५ नंतर पुनर्वसू)
🔸 आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन
(योग – व्याघात/हर्षण | करण – विष्टी व शकुनी)
🔯 राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)
♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ):
चंद्र-मंगळ लाभ योग आहे. गुरूशी चंद्राची युती तुमच्यासाठी शुभफलदायी ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मनासारखी कामे पूर्ण होतील. प्रश्न सुटतील. सामाजिक वर्तुळात दबदबा वाढेल.
♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो):
आनंददायक दिवस. कलाकारांना संधी मिळेल. घरगुती कामांमध्ये प्रगती. वाहनसुखाचा योग. नोकरीत चांगला अनुभव येईल.
♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, ह):
तुमच्याच राशीत गुरू-चंद्र युती आहे. आत्मविश्वास वाढेल. मनात आनंद राहील. आवडती वस्तू खरेदी कराल. आर्थिक बाजू भक्कम. भावंडांकडून मदत.
♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो):
संमिश्र परिणाम. खर्च वाढेल. अध्यात्मिक लाभ संभवतात. सेवा-दान करण्याची संधी. संतुलन राखणे आवश्यक.
♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे):
चंद्र अनुकूल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. महत्वाच्या कामात यश. मौल्यवान वस्तूंचा लाभ. प्रगतीची घोडदौड.
♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो):
व्यवसायात वाढ. नोकरीत प्रतिष्ठा. खर्च होईल पण योग्य कारणासाठी. मानसिक समाधान मिळेल.
♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते):
धनधान्यात वृद्धी. व्यवसाय वाढेल. प्रवासाचा योग. सहकाऱ्यांपासून लाभ. भाग्योदयाच्या शक्यता.
♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु):
संमिश्र दिवस. महत्वाच्या व्यक्तींची भेट. प्रवास संभवतो. सावधगिरीने निर्णय घ्या. अधिकार मिळतील.
♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे):
कोर्ट प्रकरणात यश. शत्रू माघार घेतील. आर्थिक स्थिती सुधारेल. पश्चिम दिशेकडे प्रवास फायदेशीर. आत्मिक समाधान.
♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी):
येणी वसूल होणार. चिंता कमी होतील. कौटुंबिक वातावरण सुखद. जुने प्रश्न सुटतील.
♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा):
शेअर मार्केटमध्ये नफा. आर्थिक स्थैर्य. संततीबाबत शुभवार्ता. कोर्ट प्रकरणात यश. अध्यात्मिक उन्नती.
♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची):
व्यवसायात यशस्वी वाटचाल. नवीन करार होतील. जमीन व्यवहारात फायदा. वास्तू संबंधी शुभ काल.
२३ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर बुध, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला जीवनात यश मिळते व मानमरातब आणि संपत्ती याचा लाभ होतो. स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे तुम्हाला आवडते. भिन्नलिंगी व्यक्तीमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. तुम्ही प्रेमळ असून स्वातंत्र्याचे भोक्ते आहात. तुमच्याजवळ चांगले शब्द भंडार आहे त्यामुळे लेखन भाषण देणे आणि शिकवणे याच्यात तुम्ही यशस्वी होतात. तुम्हाला सर्व गोष्टी झटपट केलेल्या आवडतात. इतरांच्या बाबत व परिस्थितीबाबत तुम्ही अतिशय संवेदनशील असून परिस्थितीचा ही तुमच्यावर फार मोठा परिणाम होतो. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगण्याची तुम्हाला आवड असते. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याची पूर्व नियोजित योजना तुम्ही तयार करतात. बौद्धिक गोष्टींचे तुम्हाला विलक्षण आकर्षण असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असून तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. नाविन्य आणि प्रवासाची आवड ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. जे पीडित लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते. तुमची स्मरणशक्ती चांगली असून आप्त जन तुम्हाला प्रिय असतात. विरुद्ध बाजूच्या व्यक्तीची क्षमता तुम्ही जाणू शकतात त्यामुळे त्याच्यातील न्यूनतेचा फायदा तुम्ही उठवू शकतात. तुमच्यात भाषा चातुर्य असते. तुम्ही मनाने कमकुवत असल्याने अस्वस्थ असतात. तुम्हाला आपल्या आवाजाची देणगी असते. तुमची बहुतेक सुखे मानसिक पातळीवर असतात आणि त्यांना व्यावहारिक पातळीवर आणण्याचा तुमचा दृष्टिकोन असतो. सहकार्य आणि समाजप्रियता ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. तुमच्या शब्दात आणि कृतीत ठामपणे असतो. दुसऱ्याला न दुखावण्याचा स्वभाव तुमचा असतो. आणि तुम्ही सहकार्य करतात. फारशी बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही. स्त्रियांमध्ये सुखी वैवाहिक जीवन दर्शवते. लहान वयात एखादे प्रेम प्रकरण असू शकते. तुम्ही कृतिशील असून तुमच्यात भाषण चातुर्य आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला जुगारी वृत्ती किंवा कोडे सोडवण्याचा छंद असू शकतो.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, हिरवा.
शुभ रत्न:- पाचू, हिरा, मोती.
📞 कुंडली परीक्षण, विवाह योग, व्यवसाय, आरोग्य, रत्न, ग्रहदशा याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क करा:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
👉 “राशीभाव” फेसबुक पेजला नक्की भेट द्या!
