ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन कृष्ण नवमी विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.
आज उत्तम दिवस आहे.
नक्षत्र – पुष्य /(दुपारी १२.०० नंतर) आश्लेषा
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक Marathi Rashi Bhavishya
मेष:आज कामात एकाग्रता ठेवा. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. प्रवास टाळावा.
वृषभ:कौटुंबिक विषयात सौहार्द राहील. अडकलेले पैसे परत येण्याची शक्यता. आरोग्य उत्तम राहील. शुभ रंग — पांढरा.
मिथुन:मनात थोडी अस्वस्थता राहू शकते. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. जिवलग मित्राकडून मदत मिळेल.
कर्क:नवीन संपर्कातून लाभ होईल. कार्यक्षेत्रात प्रगतीची चिन्हे. प्रवास यशदायी ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी.
सिंह:पद, प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढण्याची शक्यता. वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ.
कन्या:व्यवसायात नवीन योजना आखा. दैनंदिन कामात काटेकोरपणा ठेवा. आरोग्याचा त्रास संभवतो. विश्रांती घ्या.
तुळ:जोडीदाराशी गैरसमज होऊ शकतो. संवाद साधा. कामात धावपळ जास्त पण निकाल चांगले. मित्रांचे सहकार्य लाभदायी.
वृश्चिक:कामात स्थैर्य मिळेल. मानसिक समाधान मिळेल. दुपारनंतर शुभ वार्ता मिळण्याची शक्यता. धार्मिक प्रवृत्ती वाढेल.
धनु:नवीन संधी मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. खर्च वाढेल पण समाधानही मिळेल. शुभ रंग — पिवळा.
मकर:कौटुंबिक जीवनात शांतता राखा. कार्यस्थळी मतभेद होऊ नयेत याची काळजी घ्या. संयम ठेवा.
कुंभ:धनलाभाचा योग. घरात मंगल कार्य ठरू शकते. मित्रांकडून मदत मिळेल. मन प्रसन्न राहील.
मीन:भावनांवर नियंत्रण ठेवा. निर्णय विचारपूर्वक घ्या. संध्याकाळी प्रिय व्यक्तींच्या सहवासात आनंद मिळेल.
आजचा उपाय:
गुरु किंवा वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आणि पिवळ्या फुलांचा अर्पण करा — दिवस मंगलमय जाईल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. ..- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
