आजचे राशिभविष्य बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन कृष्ण द्वितीया. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज शुभ दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – अश्विनी/ (रात्री १०.४५ नंतर) भरणी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.(Marathi Rashi Bhavishya)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. त्याचा मंगल आणि बुधाशी प्रतियोग आहे. कोर्ट कामात अपयश संभवते. शत्रू आज शिरजोर होऊ शकतो. मात्र वेळ सत्कारणी लावाल. प्रिय व्यक्तीची भेट होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आजचे ग्रहमान अनुकूल नाही. चंद्र व्यय स्थानी आहे. मात्र आज आर्थिक लाभ होतील. जुने वाद मिटतील. तुमच्या बाबत एखादी अफवा पसरू शकते. आज चैनीच्या वस्तूंची खरेदी होईल. चोरीचे भय आहे.
मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) चंद्र अनुकूल आहे तरीही ग्रहमान संमिश्र आहे. खर्च वाढू शकतात. घरातील व्यक्तींशी मतभेद संभवतात. मन अस्थिर राहील. चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. जिभेवर ताबा ठेवा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) धनलाभ होईल. समाज मान्यता मिळेल. उन्नती होईल. पाळीव पशूंबद्दल प्रेम निर्माण होईल. मात्र पोट दुखीचा त्रास होऊ शकतो. मनात वाईट विचार येणे, मानसिक अस्वास्थ्य यांचा अनुभव येईल. मित्रणाकडून फसवणूक संभवते.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. तृतीय मंगळ तुम्हाला धैर्य देईन. तुमचा दर्जा वाढेल. बढती आणि बदलीचे योग आहेत. सुवर्ण अलंकार प्राप्ती होईल. मात्र बुध तुमचा खर्च वाढवेन. स्वजनांशी वैर संभवते. आज सावधपणे वागावे.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अष्टम स्थानी चंद्र आहे. आज प्रतिकूल दिवस आहे. धन नाश संभवतो. अनामिक भय दाटून येईल. तुमच्या कठोर बोलण्याने विनाकारण शत्रू वाढतील. इतरांबद्दल ईर्षा बाळगू नका. आज तुमची फसवणूक होऊ शकते.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुमच्या सप्तम स्थानी चंद्र आहे. तुमच्या राशीतील मंगळाशी आणि बुधाशी प्रतियोग आहे. आज तुम्हाला बंधनात पडल्यासारखे वाटेल. विनाकारण वाद संभवतात. तुमच्या अजपर्यटच्या मतात बदल होईल. वरिष्ठांचा रोष पत्करावा लागू शकतो. उष्णतेचा त्रास जाणवेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) षष्ठ स्थानी चंद्र आहे. व्यवसाय वाढेल. अर्थलाभ होईल. नवीन खरेदी होईल. मात्र नाराज बुध आणि मंगळ तुमच्या अडचणी वाढवतील. मित्रणाशी भांडण तर पत्नीशी देखील कलह होऊ शकतो. पराभवाचे भय आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल बुधा आणि मंगळ आज तुमची भारभरात करून देतील. हा कालावधी चांगला आहे. तुमच्या हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल. भूमी लाभ होईल. नवीन वाहन खरेदी होऊ शकते. जमीन किंवा शेती विकत घेतली जाईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. चंद्र अनुकूल नाही. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. तरीही काही प्रमाणात सौख्य प्राप्ती होईल. प्रवासात फायदा होईल. सुंदर व्यक्तीचा सहवास लाभेल. मात्र दुरवर्तन टाळा. प्रयत्न कमी पडू देऊ नका.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तृतीय स्थानी चंद्र आहे. अर्थलाभ होईल. व्यवसाय वाढेल. मात्र ग्रहमान संमिश्र आहे. तुम्ही पदभ्रष्ट होऊ शकतात. कार्यात विघन येऊ शकतात. काही दूषणे आणि खोटे आरोप यांचा समान करावा लागेल. कंटाळवाणे प्रवास करावे लागतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. संपत्तीची हानी दर्शवत आहे. त्यातच आठवा मंगळ आहे. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. एखादे संकट येऊ शकते मात्र अनुकूल बुध तुम्हाला तुमच्या कार्यात निपुणता प्राप्त करून देईन. मुत्सद्दीपणा दाखवल्यास यश मिळेल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!