आजचे राशिभविष्य बुधवार, ३ सप्टेंबर २०२५
३ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपदशुक्ल एकादशी. वर्षा ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस आहे” *परिवर्तीनी एकादशी*
नक्षत्र – पूर्वाषाढा/उत्तराषाढा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
३ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर गुरु आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून मान मरातब आणि प्रतिष्ठा या गोष्टींची जपणूक करतात. तुम्हाला शुद्ध प्रेम आणि न्याय आवडतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. स्वतःबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा डोळसपणे करतात. तुम्ही टापटीप, व्यवस्थित आणि काटेकोर असतात. तुमची बुद्धिमत्ता व्यवहारात उपयोगी पडते. इतरांसाठी तुम्ही कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकार आणि गुढविद्या आवडतात तसेच धर्म आणि तत्वज्ञान याची देखील आवड आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुम्ही त्याकडे संयमाने बघतात. तुमची उपस्थिती इतरांना आवडते. तुम्ही सावधपणे पावले टाकतात आणि उत्तम सल्लागार असून जीवनातील समस्यांवरती योग्य मार्ग शोधून काढतात.
व्यवसाय:- राजकीय नेते, न्यायाधीश, सचिव, धार्मिक शिक्षक, डॉक्टर, केमिस्ट, शैक्षणिक क्षेत्र.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथीस्ट आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र ग्रहमान आहे. चंद्राचा मंगळाशी केंद्र योग तर गुरुशी प्रतियुती आहे. अचानक एखादी सुखद घटना घडेल. योग्य करणासाठी खर्च कराल. धनलाभ होईल मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. प्रवासात अचानक एखादी अडचण येऊ शकते.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अष्टम स्थानी चंद्र आहे. कलाकारांना उत्तम दिवस आहे. धनलाभ होईल. संपत्ती वाढेल. मात्र खर्च देखील वाढणार आहे. इलेक्ट्रॉनिक व इतर मौल्यवान वस्तू सांभाळा.
मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र ग्रहमान आहे. सप्तम स्थानी चंद्र आहे. भ्रमंती घडेल. नैतिकता सोडू नका. विनाकारण राजकारणाचा बळी होऊ शकतात. गैरसमज होतील. शत्रूभय आहे. कोर्ट कामात विलंब होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) षष्ठ स्थानी चंद्र आहे. वाहन सौख्य लाभेल. धनलाभ होईल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ व्यतीत कराल. नोकरीत कटकटी होऊ शकतात.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ होतील. मेहनत वाढवावी लागेल. खर्चात वाढ होणार आहे. मात्र धार्मिक कार्यात वेळ व्यतीत होईल. तीर्थयात्रा घडेल. नोकरीत त्रास जाणवेल.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रणयरम्य दिवस आहे. शिवाय धनलाभ देखील होणार आहे. आनंदीत व्हाल. मात्र मत्सर त्रास जाणवेल. खर्च वाढणार आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तृतीय चंद्र आहे. व्यवसाय वाढणार आहे. मात्र ग्रहमान फारसे अनुकूल नाही. विनाकारण घरगुती गोष्टी बाहेर चर्चेत आणू नका. शत्रू त्याचा पुरेपूर फायदा घेईल. संयम ठेवा. योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवा.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नात्यातून ओळखी वाढतील. मित्र भेटतील. प्रेमात यश मिळेल. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी यांच्या मते धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. अधिकाराचा गैरवापर टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. कुटुंब सुख लाभेल. धनवृद्धी होईल. स्थावर संपत्ती वाढेल. शेअर्स मध्ये मात्र नुकसान संभवते. एखादी अप्रिय बातमी येऊ शकते.
मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच व्यय स्थानी चंद्र आहे. प्रतिकूल ग्रहमान आहे. आज महत्वची कामे नकोत. कोणत्याही राजकारणात पडू नका. वेळ बघून दोन पावले मागे या. अप्रिय घटना घडू शकते.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र ग्रहमान आहे. चंद्र अनुकूल आहे. मात्र खर्च वाढतील. अनोळखी व्यक्तीकडून विनाकारण खिल्ली उडवली जाऊ शकते. गुरू अनुकूल आहे मात्र त्याच्या फ्लॅट आज काहीशी कमतरता जाणवू शकते.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. प्रगतीचा आलेख उंचावेल. मन आनंदी राहील. कोर्ट कामात मात्र अपयश येऊ शकते. शत्रूच्या ताकदीचा अंदाज घ्या. हानी वाढू शकते. श्री. दत्तगुरूंची उपासना करा.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
