धाडसी अभिनेत्रीने वाचवली गाय ! ४० फूट खोल विहिरीत घेतली उडी

0

मुंबई, दि. ९ जुलै २०२५ – Marathi TV actress stunts स्टार प्रवाहवरील ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. मालिकेतील कृष्णा ही व्यक्तिरेखा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे, आणि तिची भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर नुकत्याच एका धाडसी प्रसंगामुळे चर्चेत आली आहे.

मालिकेच्या नव्या भागात कृष्णा तिच्या लाडक्या गाईला – स्वातीला – वाचवण्यासाठी ४० फूट खोल विहिरीत उडी मारते. वास्तविक आयुष्यातही समृद्धीने हा सीन कोणताही बॉडी डबल न घेता स्वतः पूर्ण केला. हा प्रसंग कोल्हापूरच्या एका शेतात शूट करण्यात आला. विहीर खोल, पाण्याने भरलेली, आणि सर्वत्र तणावाचं वातावरण – अशा परिस्थितीतही समृद्धीने अफाट धाडस दाखवत एका टेकमध्ये सीन पूर्ण केला.

समृद्धीने अनुभव शेअर करताना सांगितले,( Marathi TV actress stunts) “मला पोहायला येतं, पण इतक्या खोल विहिरीत उतरायचा अनुभव पहिलाच होता. हा सीन करताना मनाची तयारी खूप महत्त्वाची होती. संपूर्ण टीमने माझी खूप काळजी घेतली. विहिरीत माझ्यासोबत दोन पट्टीचे पोहणारे होते. एक वेगळा आत्मविश्वास या सीननंतर निर्माण झाला.”

या धाडसी प्रयोगामुळे अभिनेत्री समृद्धी केळकरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मालिकेच्या टीमने हा सीन वास्तवदर्शी वाटावा यासाठी कोणतीही तडजोड न करता मेहनत घेतली, त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात अजून खोलवर स्थान मिळवण्यात यश आले आहे.

प्रेक्षकांनी हा सीन बघावा यासाठी समृद्धीनेही विशेष आवाहन केलं आहे –
“हळद रुसली कुंकू हसलं” नक्की पाहा दररोज दुपारी १ वाजता, स्टार प्रवाहवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!