नवी दिल्ली,दि.११ जुलै २०२३ – मारुती सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना परवडणारी कार लॉन्च करणार आहे. परवडणाऱ्या किमती असलेल्या उच्च मायलेज कारला भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. मारुती स्विफ्ट ही या सेगमेंटमधील कंपनीची पॉवरफूल कार आहे. कंपनी आता या कारची ५वी जनरेशन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
या नवीन कारला स्पोर्टी लूक देण्यात येणार असून यात रायडरला आरायदायक सीट्स तसेत लक्झरी फीचर्स देण्यात आले आहे.मात्र, कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये कंपनी पॉवरफूल १.२ लीटर ३-सिलेंडर मजबूत हायब्रिड पेट्रोल इंजिन देईल. हे आधीच लूकमध्ये अधिक आकर्षक बनवले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपल्या नवीन कारचे नाव स्विफ्ट स्पोर्ट ठेवू शकते. मात्र या बाबत अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी २०२३ च्या अखेरीस या कूल हॅचबॅकचा ग्लोबल प्रीमियर करू शकते. यानंतर ते फेब्रुवारी २०२४ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या, कंपनीने या नवीन कारच्या लाँचची तारीख आणि किंमत याबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
कंपनी आपल्या नवीन कारचे हायब्रिड व्हर्जन देखील लाँच होऊ शकते. सध्या ही कार सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल या तिन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. नवीन मारुती स्विफ्टची सुरुवातीची किंमत ६ लाख एक्स-शोरूम असण्याची शक्यता आहे. सध्या या मॉडेलचे टॉप ट्रिम ९.०३ लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध होणार आहे असं समजते .
कारला 1.2 1.2-लीटर ड्युअल पेट्रोल इंजिन दिले जाईल. जे 90PS ची पॉवर आणि 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही कार बातारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हर्जनमध्ये लॉन्च केली जाईल. 9-इंचाची टचस्क्रीन म्युझिक सिस्टीम, क्रूझ कंट्रोल, ऑटो एसी, कनेक्टेड कार टेक यांसारख्या आधुनिक वैशिष्ट्यांसह ही कार येईल. सुरक्षेचा विचार करता कारमध्ये सहा एअर बॅग असतील.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन स्विफ्ट स्पोर्टमध्ये सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह 1.4L K14D टर्बो पेट्रोल इंजिन देखील दिले जाऊ शकते.
नवीन कारच्या पुढील बाजूस नवीन ग्रिल, नवीन एलईडी घटकांसह स्लीक हेडलॅम्प, फॉक्स एअर व्हेंट्स आणि नवीन बॉडी पॅनेल्स आणि ब्लॅक-आउट पिलर, सुधारित बंपर मिळू शकतात. मात्र, कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.