कुटुंबाचे सामुहिक विषप्राशन :पती-पत्नीचा मृत्यू ,मुलगी गंभीर

0

नागपूर,दि,६जुलै २०२४ – नागपूर येथून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक अडचण व कर्करोगाच्या आजाराला कंटाळून कुटुंबाचे सामुहिक विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. यामध्ये पती-पत्नीचा घरीच मृत्यू झाला असून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलीला रुग्नालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

ही घटना नागपुरातील जरीपटका परिसरातील आर के स्कूल जवळ शुक्रवारी (दि.५) उघडकीस आली. विजू अय्यर आणि प्रिया अय्यर अशी मृत पती- पत्नीची नावे आहेत. तर ११ वर्षीय मुलगी वैष्णवी हिच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत

या पती-पत्नीने आधी शितपेयातून आपल्या मुलीला विष दिले. त्यानंतर या दोघांनी ते घेतल्याचे कळते. हे अय्यर कुटुंबीय मूळचे केरळमधील असून तीन-चार महिन्यापूर्वीच ते या भागात भाड्याने राहण्यास आले होते. घरमालक प्रकाश वारे यांच्या फिर्यादीवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी प्रियावर कर्करोगाचे उपचार सुरू असल्याने या रोगाला व महागड्या उपचारामुळे आर्थिक संकटाला कंटाळून या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.