मुंबईत इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग :७ जणांचा होरपळून मृत्यू 

0

मुंबई,दि.६ ऑक्टोबर २०२३ – मुंबईतील गोरेगावमध्ये एका इमारतीमध्ये मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.तर ४६ जण जखमी झालेत.तर ३० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश करण्यात आलंय.मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून,सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्या आहेत. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक याचा तपास करत आहेत.मृतांच्या नातेवाईकांना शासना कडून ५ लाखाची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीला ही आग लागली होती.ग्राउंड प्लस पाच मजल्याची ही इमारत होती.या आगीमुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.दरम्यान,ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

जखमींमध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे.जखमींना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बाहेर काढून मुंबईच्या ट्रॉमा केअर आणि कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या आगीत तळमजल्यावर वरील काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्याची माहिती देखील मिळत आहे.नागरिक झोपेत असल्याने बाहेर पडण्यास उशीर झाला. त्यामुळे आकडा वाढल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!