ज्येष्ठ पत्रकार नरहरी भागवत यांना मावळमराठा पुरस्कार जाहिर

0

नाशिक (प्रतिनिधी) – नाशिकचे ज्येष्ठ तपस्वी पत्रकार .नरहरी बाळकृष्ण भागवत यांना मुंबईहून प्रसिद्ध होणा-या साप्ताहिक मावळमराठाचा प्रदीर्घ उल्लेखनीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.दि १९ एप्रिल २०२२ रोजी पंचवटी येथील पंडित पलुस्कर सभागृहात सायंकाळी ५.०० वाजता साप्ताहिक मावळमराठाचा १८वा वर्धापनदिनी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार श्री.राहुल ढिकले आणि माजी आमदार श्री.हेमंत टकले यांच्या तसेच विशेष अतिथी श्री.जयप्रकाश पवार(संपादक दिव्य मराठी)श्री.शैलेंद्र तनपूरे( संपादक महाराष्ट्र टाइम्स, नाशिक आवृत्ती) श्रीमती वैशाली बालाजीवाले (संपादिका दै.देशदूत) यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.भागवत यांना सन्मानित करण्यात येईल.अध्यक्षस्थान विधानभवन जनसंपर्क अधिकारी श्री.निलेश मदाने हे भूषविणार आहेत.

शाल,श्रीफल, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.साप्ताहिक मावळमराठाने प्रतिवर्षी महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात आपला वर्धापनदिन साजरा करण्याची आणि तेथील ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानित करण्याची परंपरा जपली आहे. गतवर्षी गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री.गुरूदास सावळ यांना आपला पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. मावळमराठाचे संपादक सदानंद खोपकर यांनी ही माहिती दिली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!