एम.ई.टी.भुजबळ नॉलेज सिटी आयोजित ‘इपॉक 2023’ प्रदर्शनाचे शनिवारी उदघाटन 

0

नाशिक,दि. ३ नोहेंबर २०२३ – एम.ई.टी. भुजबळ नॉलेज सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या  ‘इपॉक 2023’ प्रदर्शनाचे उदघाटन  उद्या शनिवार  दिनांक ४ नोव्हेंबर 2023 ला सिटी सेंटर मॉल येथे  होणार आहे.

104.2 एफ.एम. चॅनल तसेच द्वारकामाई बिल्डर्स प्रायोजित ‘इपॉक2023″ या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या एम.ई.टी. भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी आयोजित ‘इपॉक 2023’ या विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या प्रॉडक्ट प्रदर्शनाचे व विक्रीचे उद्घाटन उद्या शनिवार दिनांक ४ नोव्हेंबर 2023 रोजी सिटी सेंटर मॉल दुसऱ्या मजल्यावर सकाळी दहा वाजता होत आहे.

साधारणपणे २० हून जास्त विद्यार्थ्यांचे ग्रुप असलेले स्टॉल्स या ‘इपॉक 2023’ कार्यक्रमासाठी तयार केले असून या सर्व स्टॉलवर होणाऱ्या विक्रीच्या प्रॉडक्ट मध्ये त्याची निर्मिती विद्यार्थ्यांनी स्वतः केली आहे प्रामुख्याने या मार्केटिंग ऍक्टिव्हिटी मध्ये विद्यार्थ्यांना सर्व शिकता यावे तसेच कस्टमर रिलेशन सर्व हिशेब आणि व्यवसायाची जाणीव पूर्णपणे विद्यार्थ्यांना व्हावी आणि ब्रॅण्डिंग व ओव्हरऑल सर्व त्यांना शिकता यावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला आहे.

राईट फ्रॉम स्क्रॅच म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व काम विद्यार्थी करत आहेत या विक्रीतून झालेल्या किंवा मिळालेल्या पैशाचा वापर सामाजिक कार्यासाठी होणार आहे एम. ई. टी. भुजबळ नॉलेज सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सर्व स्टाफ व विद्यार्थ्यांनी या अतिशय नोबल कॉज असलेल्या “इपॉक2023’ला सर्वांनी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.