हवामान विभागाचा अलर्ट; ताशी ५० किमी वेगाने वारे वाहणार,तुफान पाऊस पडणार!

मुंबईत धुळीचे वादळ :भर दुपारी काळोख 

0

मुंबई,दि,१३ मे २०२४ –गेल्या दोन दिवसांपासून पुणे,नाशिकसह विदर्भातील अनेक भागाला पावसानं झोडपल्यानंतर आता मुंबईसह नवी मुंबई,ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसानं नागरिकांची तारंबळ उडाली आहे.मुंबईकरांनी मोठ्या वादळाचा सामना केला आहे.भर दिवसा मुंबईत काळोख पडला होता. तुफान वारा वाहत होता.यानंतर पाऊस देखील पडला आहे. हवामान विभागाने मुंबईकरांना अलर्ट जारी केला आहे.

पुढील ३ ते ४ तास मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मुंबईत प्रतितास ४० ते ५० किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने वारे पाहणार आहेत.हवामान विभागाने हा अलर्ट जारी केला आहे. मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोलीत आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय..यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोलीत वादळी वा-यासह मुसळधार पाऊस होईल तसंच गारपिटीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.प्रादेशक हवामान विभागाकडून पूर्व आणि पश्चिम विदर्भासाठी हा इशारा देण्यात आलाय.

मुंबईत भर दुपारी काळोख पडला
मुंबईमध्ये भरदुपारी काळोख पडला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली.मुंबईसह उपनगरांतही जोरदार पाऊस पडतोय.दादर सायन माटुंगा कुर्ला परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे,मुंबईत अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळं उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.