राजस्थान मध्ये मिग २१ विमान कोसळले :दोन महिला ग्रामस्थांचा मृत्यू

व्हिडीओ पहा

0

जयपूर,दि.८ मे २०२३ –राजस्थान मध्ये लष्कराचे मिग २१ विमान कोसळे असून या दुर्घटनेत २ महिलांचा मृत्यू झाला.तर एक नागरीक जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. विमानाचे दोन पायलटला पायलट सुरक्षित आहे. विमान कोसळल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.

या विमानाने सुरतगढ येथून उड्डाण केल्यानंतर ते हनुमान गढ येथे अचानक कोसळले अपघातानंतर विमानाने पेट घेतला आणि विमान जळून खाक झाले. विमान कोसळल्याची माहिती मिळतात लष्कराचे हेलिकॉप्टर अपघातस्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

जानेवारीच्या सुरुवातीलाच भरतपूर येथे प्रशिक्षणादरम्यान हवाईदलाच्या दोन विमांची हवेत टक्कर झाली होती. सुखोई एसयू30 आणि मिराज 2000 लढाऊ विमानांमध्ये झालेल्या धडकेत एका पायलटला जीव गमवावा लागला होता. तसेच राजस्थानमध्ये गेल्यावर्षी 28 जुलैला मिग-21 विमान कोसळले होते. बाडमेर जिल्ह्यात मिग-21 ट्रेनर विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. यात विमानातील दोन्ही पायटलचा मृत्यू झाला होता.

गेल्या आठवड्यामध्ये जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते. तर एप्रिलमध्ये कोची येथे चाचणी दरम्यान तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर अपघातातून बचावले होते. तसेच गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याच्या दोन घटना घडल्या. 5 ऑक्टोबरला तवांग भागात चिता हेलिकॉप्टर कोसळून एका पायलटचा मृत्यू झाला, तर त्यानंतर सियांगजवळ झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत संरक्षण दलातील पाच कर्मचारी ठार झाले होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.