आ.बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा

दोन वर्षांच्या शिक्षेनंतर आमदार बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया

0

नाशिक,८ मार्च २०२३ – सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.सरकारी कामात अडथळा आणण्या प्रकरणी  नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने याबाबत महत्वपूर्ण निकाल दिला आहे. दरम्यान आमदार कडू यांना  १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाआहे.

दिव्यांगांच्या मागण्यांसाठी २०१७ साली आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महापालिकेत आंदोलन केलं होते.त्यावेळी नाशिक महापालिका आयुक्तांवर आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता.त्यानंतर  हे प्रकरण कोर्टात पोहोचले. या प्रकरणात बच्चू कडू यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. आंदोलना दरम्यान बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांवर हात उगारला होता. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी २ वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान प्रहारच्या माध्यमातून नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, याबाबत आंदोलन सुरु होते. यावेळी प्रहारच्या शिष्टमंडळाकडून तत्कालीन आयुक्तांची भेट घेण्यात आली होती. यावेळी आमदार बच्चू कडू आणि तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात चकमक झाली होती. सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.

दरम्यान याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी एक अशी २ वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी झाली नसल्याकारणानं तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण यांना घेराव घालण्यात आला होता. त्याचवेळी बाचाबाची झाल्यानं बच्चू कडू यांनी आयुक्तांवरच थेट हात उगारला होता. नाशिक महापालिकेनं १९९५ चा अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी खर्च केला जात नसल्यामुळे मनपा मुख्यालयासमोर प्रहार संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं होत.

काय आहे नेमकं प्रकरण?
आमदार बच्चू कडू राज्यातील दिव्यांग बांधवासाठी काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. दरम्यान नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, म्हणून २०१७ मध्ये प्रहार संघटनेच्या वतीने नाशिक महापालिकेवर आंदोलन करण्यात आलं होते. यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि ते आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारण्यात आल्याचे सांगितले जाते. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद सोडविला होता.

आ.बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया
दोन वर्षांच्या शिक्षेनंतर बच्चू कडू यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले  कोर्टाने जामीन दिला आहे. सामान्य माणसाने पत्र दिल्यानंतर सात दिवसात उत्तर दिले पाहिजे. एकही उत्तर दिले गेले नाही. कायद्याची ऐशी की तैशी तत्कालीन संबंधित आयुक्तांनी केली. हक्काचा निधी खर्च करत नाही. अधिकार म्हणून केले आणि शिक्षा आम्हाला सुनावली गेली, असे बच्चू कडू म्हणाले.

‘३५३ चा अतिरेक होतोय,! अधिकारी याचं कवच करतायेत’
पत्र देऊनही उत्तर दिले जात नाही. तीव वर्षे निधी खर्च केला नाही. आमचा हेतू तत्कालीन आयुक्ताला मारण्याचा उद्देश नव्हता. तीन 3 टक्के खर्च का करत नाही म्हणून आम्ही आलो होतो. आता 353 चा अतिरेक होत असून अधिकारी याचं कवच ते करत आहेत. विधान सभा अधिवेशनात याबाबत आवाज उठवला जाईल. विधानसभेत जमले तर 353 वरुन लक्षवेधी मांडणार आहे. देशातले गुन्हेगार जर पाहिले तर याचा विचार झाला पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.विधान सभेतून कायदा आणि मंत्रालय चालत आहे. मुख्यमंत्री कार्यालय सचिवाल्यातून चालते. ३५३ मध्य नवीन कमिटमेंट करण्याची गरज काय? मुख्यमंत्री , सर्व आमदार यांना भेटणार आणि या विषयावरुन विधान सभेत जाणार आहे. नेहमी नेहमी धमकी देण्याची गरज काय? आमच्यावर ३२ गुन्हे आहेत. त्यामुळे सतत न्यायालयात हजर राहणे कसे शक्य आहे, असा सवाल बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान,  सरकारी वकील सचिन बोरवडकर यांनी सांगितले की, १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर बचू कडू यांना तात्पुरता जामीन मिळाला आहे. २४ मे २०१७ साली मनपा आयुक्तालयात बचू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत अर्वाच्य भाषेत बोलल्याने व शासकीय कर्मचाऱ्यांना अपमानित केल्याने न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली होती.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!