मनसेची ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; राज’पुत्र’अमित ठाकरे मैदानात

पुतण्या आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही उमेदवार

0

मुंबई,दि. २३ ऑक्टोबर २०२४ –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या ७ उमेदवारांची नावे आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात जाहीर केली  त्यानंतर, ठाण्यातील कल्याणमध्ये आमदार राजू पाटील यांच्या कार्यक्रमासाठी आल्यानंतर ठाणे व कल्याण ग्रामीणमधील २ उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्यानंतर एकूण ९ उमेदवारांची नावे जाहीर केल्या नंतर राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे मनसेच्या ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.  त्यामध्ये, राजपुत्र अमित ठाकरेंना मुंबईतील माहीम मतदारसंघातून मनसेची उमेदवारी देण्यात आली आहे.तर,संदीप देशपांडे यांना वरळी मतदारसंघातून आणि बेलापूरमधून गजानन काळेंनी उमेदवारी देण्यात आली आहे.

राज ठाकरेंनी दुसऱ्या यादीत भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातही उमेदवार दिला असून यंदा वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देत पुतण्या आदित्य ठाकरेंविरुद्धही उमेदवार दिला आहे. विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे)  दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे.

अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता होती, ती आता खरी ठरली असून अमित ठाकरेंना माहिम मतदारसंघातून उतरवण्यात आलं आहे. पहिल्या यादीत मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.

सोमवारी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी सोमवारी पक्ष निरीक्षकांकडून आलेल्या अहवालावर चर्चा केली. कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची? मनसे उमेदवार ती जागा जिंकू शकतात का? याचा आढवा घेतला होता. तसेच अमित ठाकरे यांनी माहीम मतदरसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह बैठकीत धरला.

दरम्यान, राज ठाकरेंनी यापूर्वीच मनसेच्या ९ उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, ठाणे जिल्ह्यातील ठाणे व कल्याणमधून दोन उमेदवार देण्यात आले आहेत. आता, ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. त्यामध्येही अविनाश जाधव यांचं नाव जाहीर आहे.

मनसेनं यापूर्वी जाहीर केलेले उमेदवार
१. बाळा नांदगावकर – शिवडी, मुंबई
२. दिलीप धोत्रे – पंढरपूर
३. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
४. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
५. चंद्रपूर – मनदीप रोडे
६. राजुरा – सचिन भोयर
७. यवतमाळ – राजू उंबरकर
८. ठाणे – अविनाश जाधव
९. कल्याण-डोंबिवली – राजू पाटील

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.