मुंबई –मी धर्मांध नाही..प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. यापूर्वी पण मी मशिदींवरील भोंग्याबाबत बोललो होतो. पण अजूनही ते सुरू आहे. यापुढे सरकारने मशिदीतील हे भोंगे काढले नाही तर त्या मशिदींबाहेर दुप्पट आवाजाने स्पिकर लावू आणि त्यात हनुमानचालीसा वाजवू’, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
कोरोना काळा नंतर दोन वर्षांनी मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर झाला.हजारो मनसैनिकांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या मेळाव्याला सायंकाळी उत्साहात सुरुवात झाली. दोन वर्षांनंतर होणाऱ्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होत यावेळी राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले.
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
* बाळासाहेबांचं स्मारक बांधायचे असेल तर मोठं बांधा. तुम्हाला बंगला आवडा म्हणून घेऊ नका. रात्री सगळी तिकडेच असतात, परदेशी गाड्या तिकडे लागतात.
* मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या घरातही कट दिसला का ? हल्ली हे कट वर चालतात. मग ईडीने कट केला तर मग मुख्यमंत्री का संतापले. यशवंत जाधव यांच्या घरात दोन दिवस रेड चालली. मोजत काय होते? आजकाल घरचे यशवंत हो असा आशीर्वाद दे नाहीत, तर म्हणतात यशवंत जाधव हो.
* मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले .मलाही ईडीची नोटीस आली होती, तेव्हा मी गेलो होता. दुसरीकडे यांना मात्र आता संपत्ती जप्त यांची करायला सुरू केली तेव्हा जाग आली. आता मुख्यमंत्री बोलतात आता मला अटक करा.पहिल्यांदा कुटुंबाला सांगा, मुंबई महापालिकेत जाऊ नका.
*जातीपातीचं राजकारण शरद पवारांना हवं आहे. १९९९ सालाही जात होती, मात्र त्यावेळी त्यात अभिमान होता. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर इतर जातीबद्दल द्वेष निर्माण करण्याचं काम केलं. मराठा आरक्षणासारखे मुद्दे आणायचे. जातीपातीवरुन भांडणं करता तुम्ही हिंदू कधी होणार ?
*महाराष्ट्राने असं राजकारण पाहिलं नाही. एकमेकांना टीका करणारे आज मांडीला मांडी लावून बसले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला मतदान केलं होतं. मग सरकार महाविकास आघाडीचं का ? असा सवाल रा ठाकरे यांनी उपस्थित केला .मतदारांनी युती म्हणून तुम्हाला मतदान केलं.
* दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक जेलमध्ये, पहिलं मंत्रिपद छगन भुजबळ यांना जाहीर केलं तेही दोन वर्षे जेलमध्ये होते. हे सगळं नाकावर टीच्चून केलं जातं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.