मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ?

0

मुंबई, दि. २० नोव्हेंबर २०२५MNS ShivSena Seat Sharing महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ठाकरे बंधूंमध्ये(Uddhav Thackeray Raj Thackeray) जागावाटपाच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. या चर्चेला आता नवीन वेग आला असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे बंधूंच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेमध्ये जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.राजकीय पटलावर या दोन्ही पक्षांच्या संभाव्य युतीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, जागावाटपाबाबतची प्राथमिक सहमती अनेक वरिष्ठ नेत्यांनी मान्य केल्याचेही सूत्रांकडून प्राप्त झाले आहे.

🔸 BMC मध्ये 227 पैकी 70 जागा मनसेला?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकूण 227 जागा आहेत. त्यापैकी:157 जागा शिवसेना (UBT) साठी मनसेसाठी 70 जागा असा फॉर्म्युला शिवसेना कडून प्रस्तावित केल्याची माहिती आहे. 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेला प्रत्येकी 2 जागा देण्याबाबतही शिवसेना सकारात्मक असल्याचं कळतं.मात्र काही महत्त्वाच्या मतदारसंघात वरळी, शिवडी, दादर-माहीम, भांडुप मनसेकडून अधिक जागांची मागणी होत असल्याची माहितीही पुढे येत आहे.

🔸 मनसेची अधिक जागांची मागणी?(MNS ShivSena Seat Sharing)

काही मतदारसंघात मनसेने 3 जागांची मागणी केली असून यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. युती झाली, तर दोन्ही पक्षांनी काही तडजोडी कराव्या लागतील, असं शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी संकेत दिले.

🔸 संदीप देशपांडे यांचे उत्तर युतीची घोषणा झालीच नाही’

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जागावाटपाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना अद्याप युतीची घोषणा झाली नाही”घोषणेनंतरच जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल”असे स्पष्ट केले.तसेच, “युती झाली तर राज ठाकरेच अंतिम निर्णय घेणार” असंही त्यांनी नमूद केले.

🔸 ठाकरे बंधू एकत्र येणार? मोठा राजकीय संकेत

राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी शिवसेनेचा प्रस्ताव स्वीकारणार का ? मनसेला मिळालेल्या जागांची संख्या वाढणार का? युतीची अधिकृत घोषणा कधी होणार?या सर्व प्रश्नांवर आता राज्यात मोठी चर्चा रंगत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र आल्यास आगामी निवडणुकांचे चित्रच बदलू शकते. सध्या, युती आणि जागावाटप हा चर्चेचा हॉट टॉपिक ठरला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!