युवकांना मोदी सरकारचे नोकरीचे गिफ्ट 

रोजगार मेळाव्यात ७१ हजार युवकांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

0

नवी दिल्ली,२२ नोव्हेंबर २०२२ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘रोजगार मेळाव्या’त ७१ हजार युवकांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रोजगार मेळा’ कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. या रोजगार मेळाव्यांमधून १० लाख युवकांना रोजगार मिळवून देण्याचे लक्ष्य मोदी सरकारने ठेवले आहे. ही भरती थेट मंत्रालयांकडून  किंवा यूपीएससी, एएसी, रेल्वे रिक्रूव्हमेंट बोर्डाद्वारे केली जात आहे.याआधी सर्व मंत्रालये आणि सरकारी खात्यांमधील मनुष्यबळाच्या स्थितीचा आढावा घेण्याचे आदेश जून महिन्यात पंतप्रधान मोदींनी दिले होते. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पदभरती करण्यास सुरुवात झाली आहे.

पीएम मोदी म्हणाले की, आजचा मोठा रोजगार मेळा सरकारी नोकऱ्या देण्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये कसे काम करत आहे.सेवा निर्यातीच्या बाबतीत भारत आज जगातील एक मोठी शक्ती बनला आहे. आता भारतही जगातील उत्पादन शक्ती गृह बनेल, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या जास्तीत जास्त युवा शक्तीचा राष्ट्र उभारणीत वापर व्हावा, ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तज्ज्ञ सांगत आहेत की भारताला आपली क्षमता दाखवण्याची सुवर्णसंधी आहे आणि त्यामुळे उत्पादन क्षेत्रातही भारत अव्वल ठरणार आहे.

या रोजगार मेळाव्यांमध्ये ३८ मंत्रालये आणि या अंतर्गत येणाऱ्या खात्यांमधील गट अ आणि ब (राजपत्रित), गट ब (बिगर राजपत्रित) आणि गट क अशा तिन्ही गटांमधील पदे भरण्यात येत आहेत. संरक्षण दल, उपनिरीक्षक, हवालदार, कारकून, स्टेनो, साहाय्यक, आयकर निरीक्षक ही पदे या रोजगार मेळाव्याद्वारे भरली जात आहेत. शिक्षक, प्राध्यापक, परिचारिका, नर्सिंग अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर आणि इतर तांत्रिक आणि पॅरा मेडिकल पदांवरही नियुक्ती केली जाणार असल्याचे माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली.

देशभरातील विविध ठिकाणच्या युवकांना रोजगार मेळाव्या अंतर्गत नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यामुळे ४५ ठिकाणी ही नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार पंतप्रधान मोदींनी रोजगार निर्मितीला आपले पहिले प्राधान्य घोषित केले होते ते वचन पूर्ण करत असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.पंतप्रधान कर्मयोगी प्रमुख मॉड्युल देखील लॉन्च करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी दिली होती.यादरम्यान, पीएम मोदींनी कर्मयोगी प्ररंभ मॉड्यूल – नोकरी मेळाव्यात सर्व नवीन नियुक्त्यांसाठी ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम सुरू केला.या मॉड्यूलनुसार विविध सरकारी विभागांमधील सर्व नवीन भरतीसाठी एक ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु केला आहे. या कोर्समध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता, कामाच्या ठिकाणी नैतिकता आणि सचोटी, मानव संसाधन धोरणे आणि इतर फायदे आणि भत्ते यांचा समावेश असेल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.