मोहित कंबोज, रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला : चर्चांना उधाण

0

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल ट्विट करुन खळबळ उडवून देणारे भाजप नेते मोहित कंबोज आणि फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आज काही वेळापूर्वी  सागर बंगल्यावर जाऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.नवाब मलिक, अनिल देशमुख, संजय राऊत, संजय पांडे यांच्यानंतर आणखी एक नेता तुरुंगात जाईल, असा इशारा दिला. मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळं मोहित कंबोज यांच्या ट्वविटची आज दिवसभर चर्चा सुरु होती.

मोहित कंबोज यांनी काल रात्री सलग तीन ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. मोहित कंबोज यांनी आज आणखी दोन ट्विट करत इशारा दिला होता. तर, २०१९ च्या विधानसभा निवडणूक आणि सत्तास्थापनेच्या दरम्यान फोन टॅपिंग केल्याचा आरोप असणाऱ्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्यानं भेटीत नेमकं काय चर्चा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

मोहित कंबोज आणि रश्मी शुक्ला दोघेही एकाच वेळी सागर बंगल्यावर आल्याने अनेक त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. सिंचन घोटाळ्याची चौकशी होणार का ? तसेच रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का ? अशा चर्चाही या निमित्ताने सुरू झाल्या आहेत.महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्या आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.