Monsoon 2022 : स्कायमेटने वर्तवला पावसाचा अंदाज : महाराष्ट्रात कसा असेल मान्सून !

0

मुंबई – खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने मान्सून २०२२ चा अंदाज वर्तवला आहे.या अंदाजात महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी असून महाराष्ट्रामध्ये यंदा मान्सून चांगला होणार असल्याचा अंदाज स्कायमेट एजन्सी कडून वर्तवण्यात आला आहे. मान्सूनची सुरुवात चांगली होणार असून जून महिन्यातच जास्तीत जास्त पाऊस अपेक्षित असल्याचे स्कायमेटकडून सांगण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी की, यंदाचा मान्सून त्यांच्यासाठी चांगला असेल, कारण, सुरुवातीच्या महिन्यात पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होईल, यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ८८०.६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत पावसाची ९८ टक्के शक्यता आहे. याच दरम्यान गुजरातमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल, तर पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात जास्त पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

स्कायमेटने मान्सून २०२२ चा अंदाज वर्तवला असून यानुसार यंदा सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट च्या मते, यावर्षी मान्सून सामान्य असेल आणि सरासरी पावसाच्या तुलनेत २०२२ मध्ये ९८% पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जूनच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात चांगली होईल परंतु केरळ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात जुलै आणि ऑगस्टच्या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पाऊस पडेल.राजस्थान, गुजरात, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि ईशान्येकडील त्रिपुरा सोबतच संपूर्ण हंगामात पावसाच्या कमतरतेची शक्यता आहे.तसेच पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील कृषी क्षेत्र आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पावसावर आधारित भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.