केरळमध्ये वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो मान्सून : IMD ने वर्त्तवला अंदाज

जून आणि जुलै हे शेतीसाठी महत्त्वाचे मान्सून महिने

0

नवी दिल्ली,दि,१६ मे २०२४- यावेळी मान्सून वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो.नैऋत्य मान्सून यावेळी 31 मे रोजी केरळमध्ये पोहोचू शकतो. राज्यात साधारणत: १ जून रोजी मान्सूनचे आगमन होते. भारतीय हवामान खात्याने बुधवारी ही माहिती दिली. हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे की, “यंदा नैऋत्य मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होऊ शकतो.”

यावर्षी, नैऋत्य मान्सून चार दिवसांच्या मॉडेल त्रुटीसह 31 मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे,असे भारतीय हवामान विभागाने बुधवारी सांगितले.आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी बुधवारी सांगितले की, केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख १ जून असल्याने ही तारीख सामान्य तारखेच्या जवळपास आहे.

जून आणि जुलै हे शेतीसाठी महत्त्वाचे मान्सून महिने
गेल्या महिन्यात, आयएमडीने जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. जून आणि जुलै हे शेतीसाठी सर्वात महत्त्वाचे मान्सून महिने मानले जातात कारण खरीप पिकांच्या बहुतांश पेरण्या याच काळात होतात.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.