शनिवारी नाशिककर अनुभवणार “टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर रॅलीचा”थरार

0

नाशिक,दि,२२ जुलै २०२४ –नासिक येथील सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात शनिवार दि २७ जुलै २०२४ रोजी टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर रॅलीचा थरार रंगणार असून नाशिककर स्पर्धक बरोबर बाहेरील शहरातून आलेल्या स्पर्धकांचा कसब लागणार आहे .फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया ( एफ एम एस सी आय ) या भारत सरकारच्या मान्यताप्राप्त शिखर संस्थेच्या निकषानुसार होणार आहे . हि स्पर्धा एकूण ५० कि. मी . होणार असून त्यामध्ये २४ किलोमीटर हे स्पर्धात्मक अंतर असणार आहे .

या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन शुक्रवार दि. २६ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता विल्होळी येथील केव्हज् काऊंटी रिसॉर्ट येथे होणार आहे .हि स्पर्धा नासिक येथील सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात खेळवण्यात येणार आहे .नाशिक मध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे स्पर्धा रंगतदार होणार आहे .

या स्पर्धेसाठी केव्हज काउंटी रिसॉर्ट , टीव्हीएस एनटॉर्क १२५ ,स्पोर्ट्स क्राफ्ट , व्ही ए मोटार स्पोर्ट्स फाउंडेशन , गोदा श्रद्धा फाउंडेशन , रेडिओ सिटी ९५.० , द फ्लाय मंकी आऊटडोअर ,आरपीएम १२५ , ईशा पब्लिसिटी इ. कडूनही प्रायोजकत्व लाभलेले आहे .

दर्जेदार नियमाची प्रसिद्ध असलेल्या स्पोर्ट्स क्राफ्ट संस्थेने नाशिक येथे हि स्पर्धा जाहीर करताच देशभरातील स्पर्धकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे .आज पर्यंत भोपाळ ,मुंबई ,पुणे ,इंदूर ,बंगळूर ,सांगली , कोल्हापूर ,जयपूर इ. ठिकाणच्या तब्बल ५० स्पर्धकांनी सहभाग निश्चित केला आहे .या स्पर्धेमध्ये ४८ वर्षावरील स्पर्धकांसाठी विशेष गट आयोजित करण्यात आला आहे .एकूण सहा गटांमध्ये विभागून घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत महिला गट सुद्धा सहभागी असणार आहे .

प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना रोख पारितोषिकांसह करंडक व प्रशस्तीपत्र सुद्धा देण्यात येणार आहे .नवोदित स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रथमच सहभाग नोंदवणाऱ्या स्पर्धकांपैकी सर्वोत्तम वेळ नोंदवणाऱ्या स्पर्धकाला करंडक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे .

एफ. एम. एस. सी. आय. चे निकष पाळले जात आहेत यावर देखरेखीसाठी अधिकारी म्हणून समीर बुरकुले यांची तर वाहन तपासनीस म्हणून अंकित गज्जर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .प्रत्यक्ष स्पर्धेला शनिवारी दि २७ जुलै २०२४ रोजी सकाळी ठीक ९ वाजता केव्हज् काऊंटी येथून सुरवात होईल . स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा प्रमुख गणेश लोखंडे , तसेच हर्षल कडभाने , सुरज कुटे ,कौस्तुभ मत्से ,अनिष नायर ,आनंद बनसोडे , अमित बेलगावकर , अमित सूर्यवंशी , युवराज यादव , भूपिंदर सैनी , विक्रम राजपूत यांच्या बरोबर इतर सहकारी काम बघत आहेत .

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.