आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि आयआयटी,मुंबई यांच्यात सामंजस्य करार

0

मुंबई,३ फेब्रुवारी २०२३ – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी बॉम्बे) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. आढावा बैठकीदरम्यान या सामंजस्य कराराचे आदान प्रदान सह्याद्री अतिथीगृहात विद्यापीठाचे मा. प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाच्या मा. कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प समवेत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सन्माननीय सचिव डॉ. अश्विनी जोशी, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे मा. संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, मा. प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य विद्यापीठ व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई यांच्या समवेत करण्यात आलेल्या सामंजस्य करार अंतर्गत विविध सहयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याकरीता ठोस उपा योजना व कार्यप्रणाली विकसित करण्यात येणार आहे.सदर सामंजस्य करार हा भविष्यात आरोग्य आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये एकत्रित संशोधन व आरोग्य सुविधा डिजिटल हेल्थ यांचा विकास संशोधन याच्यामध्ये एक लौकिक अर्थाने भर टाकणारा आहे.

हा सामंजस्य करार विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) व मुंबइचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजींचे संचालक डॉ. श्री. सुभाषिश चौधरी यांच्या स्वाक्षरीत करण्यात आला आहे. सदर सामंजस्य कराराची दोन्ही बाजूने प्रभावी अंमलबजावणी होण्याकरता नोडल ऑफिसर नियुक्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई यांच्या वतीने डॉ. गणेश रामकृष्णन आणि डॉ. क्षितिज जाधव प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी प्रशासकीय विभागामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव अजित सासूलकर तसेच कक्ष अधिकारी श्रीमती प्रियंका कागिनकर, विद्यापीठाचे विधी अधिकारी संदीप कुलकर्णी, विद्यापीठाचे उपकुलसचीव डॉ नितीन कावडे, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र विभागाचे समन्वयक संदीप राठोड तसेच विद्यापीठाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे विभाग प्रमुख संजय पिसाळ आदी अधिकारी उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!