मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचणारच असे नवनीत राणा,आमदार रवि राणा यांनी म्हटले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक आमने -सामने आल्याचे पहायला मिळाले.शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या राड्यानंतर अखेर नवनीत राणा आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात आले.अटकेनंतर त्यांना आज सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले असता वांद्रे कोर्टाने राणा दाम्पत्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात नवनीत राणा यांच्याविरोधात कलम ३५३ अंतर्गंत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राणा दांपत्या तर्फे ऍड रिझवान मर्चंट यांनी काम पहिले तर सरकार तर्फे ऍड. प्रदीप घरत यांनी काम पहिले
पोलिसांनी राणा दाम्पत्यांना ७ दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु ती न्यायालयाने फेटाळली आता राणा दाम्पत्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांचा जामीना साठी अर्ज मोकळा झाल्यानंतर त्यानी जमिनीसाठी अर्ज केला असून जामीन अर्जाची सुनावणी २९ एप्रिलला आता सुनावणी होणार आहे.