खा.संजय राऊत यांना मध्यरात्री अटक

स्वप्ना पाटकर यांना धमकावल्या प्रकरणीही पोलिसांत गुन्हा दाखल

0

मुंबई – पत्रा चाळ पुनर्वसन गैरव्यवहार प्रकरणी ईडी ने शिवसेना नेते संजय राऊत यांना रविवारी मध्यरात्री अटक केली आहे.त्यांना सोमवारी सकाळी ११.३० वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळी ७ वाजेपासून ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत त्यांची घरी आणि ईडी कार्यालयात त्यांची चौकशी झाली.

सोमवारी सकाळी ११.३० वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल, अशी माहिती राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी दिली. दरम्यान, राऊत यांच्या घराची झडती घेताना ईडीच्या पथकाच्या हाती साडेअकरा लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली होती. मात्र, यापैकी १० लाख रुपये अयोध्या दौऱ्यासाठी जमवलेले शिवसेना पक्षाचे असून त्यात एकनाथ शिंदे यांचेही नाव लिहिले आहे, असेही सुनील राऊत यांनी सांगितले.

स्वप्ना पाटकर यांना धमकावल्या प्रकरणीही पोलिसांत गुन्हा दाखल

दरम्यान, राऊत यांचा सहकारी सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांना धमकावल्या प्रकरणीही पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय राऊत यांच्या विरोधात मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ५०४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, स्वप्नाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये राऊत तिला धमकावताना ऐकले होते.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.