MSRTC: एसटीची भाडेवाढ होणार :महामंडळाकडून १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव
आज मध्यरात्री पासून भाडेवाढ होण्याची शक्यता
मुंबई,दि,२४ जानेवारी २०२५ –निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या ३ वर्षांपासून थांबलेली भाडेवाड आज मध्यरात्री पासून लागू होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. एसटी महामंडळाकडून १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाला दिला असून आज या भाडेवाडीवर शिक्का मोर्तब होणार आहे. आज मध्यरात्रीपासून १५ टक्के भाडेवाढ लागू होणार असून या भाडेवाढीमुळे एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
त्यावर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली. १५ टक्के भाडेवाढ झाल्यास तिकिटात ६० ते ८० रुपये वाढ होणार आहे. गेल्या तीन वर्षात एसटी भाडेवाढ करण्यात आली नाही. यंदा तीने ते साडेतीन हजार नव्या बस घेण्यात येणार आहेत. त्यामुळे भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
लालपरी सेवा सर्वत्र पोहचवते. पण महामंडळाकडे बसेस कमी आहेत. नवीन वर्षांमध्ये तीन ते साडेतीन हजार नव्या बसेस आम्ही आणत आहोत. यातील काही नवीन बसेस घेतोय तर काही भाडे तत्वावर घेतोय. अशोक लेलँडच्या २२०० बसेस आपण यामध्ये आणतोय. नव्या बसेस आल्यावर जुन्या बसेस स्क्रप कराव्या लागतील. त्यामुळे अपघात कमी होतील. यंदा एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढही करण्यात आली आहे.
गेली तीन वर्षे महामंडळाने भाडेवाढ केली नव्हती.त्यामुळे आता काही प्रमाणात भाडेवाढ केली जाईल.१५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव महामंडळाकडून ठेवण्यात आला आहे. त्यावर राज्य सरकार निर्णय घेईल अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली.
बस स्थानक स्वच्छ करण्याचा प्रयत्न आमचा असेल. बस स्थानक स्वच्छ नाहीत या मताशी मी सहमत आहोत.आम्ही जरी तोट्यात असलो तरी सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू असं भरत गोगावले म्हणाले.
[…] निर्माण झाला आहे. संबंधित कंपनी वेळेत बस पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने […]
[…] (MSRTC) ताफ्यातील तब्बल २ हजार बसगाड्या आता भंगारात टाकण्यात येणार आहेत. या […]