MSRTC:सवंग लोकप्रियतेसाठी राज्य सरकारने एसटी प्रवाशांना सवलती जाहीर केल्या 

सरकारकडे थकित असलेल्या पैशांची यादी देऊन , श्रीरंग बरगेंचा एसटी अन् कर्मचाऱ्यांच्या स्थितीचं वास्तव मांडत सरकारवर हल्लाबोल

0

Dr Smita Malpure
डॉ. स्मिता मालपुरे

आजचा रंग – निळा
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा
मुंबई,दि ९ ऑक्टोबर २०२४ –राज्य सरकारने सवंग लोकप्रियतेसाठी एसटी प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र,सवलत मूल्य परतावा एसटीला देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. हे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असून सरकारने एसटी व एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खिळखिळा केली असून सरकार चक्क तोंडघशी पडले आहे. सन २०२३-२४ च्या अर्थ संकल्पात तरतूद करण्यात आलेल्या रक्कमेतील ६१२ कोटी रुपये इतकी रक्कम अजूनही सरकारने दिली नाही. अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली
आहे.

एसटी बस मध्ये विविध प्रकारच्या सवलती प्रवाशांना दिल्या जातात त्याची साधारण ३५० कोटी रुपये इतकी रक्कम दर महिन्याला होते.सरकार कडून त्याची प्रतिपूर्ती होत नाही.ही रक्कम एसटीला देताना सरकारने कधीच पूर्णपणे दिलेली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांची वेतनातून कपात केलेली रक्कम त्यात्या संस्थांना भरण्यात आलेली नाहीत. या शिवाय इतरही सर्व देणी प्रलंबित आहेत, असा आरोप श्रीरंग बरगे यांनी केला.

थकीत रक्कम खालील प्रमाणे
भविष्य निर्वाह निधी ७५० कोटी रुपये
उपदान १०५० कोटी रुपये
एसटी बँक ९० कोटी रुपये
रजा रोखिकरण ६० कोटी रुपये
एल.आय. सी.१० कोटी रुपये
कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले ५ कोटी रुपये

या शिवाय एसटीला सामान व इंधन पुरवणारे पुरवठादार यांची अंदाजे १५० कोटी रुपयांची देणी प्रलंबित असून या पुढे डिझेल साठी व सामाना साठी गाड्या उभ्या राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच प्रमाणे पीएफ, ग्राज्युटी व एल आय सी सारख्या रक्कमा न भरणे ही जोखीम आहे.हे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असून सरकारने एसटी व एसटी कर्मचारी आर्थिक खिळखिळा केला आहे. खिळखिळ्या एसटीचा आवाज सरकारला येत नाही का? सरकार बहिरे झाले आहे का? असा सवालही बरगे यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांना प्रवासामध्ये ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली. दुसरीकडे ७५ वर्षांवरील प्रवाशांना एसटीमधून मोफत प्रवासासाठी योजना सुरु करण्यात आलेली आहे.  याशिवाय एसटीच्या नियमितपणे चालवल्या जाणाऱ्या योजना देखील सुरु आहेत. श्रीरंग बरगे यांनी टीका केल्यानंतर राज्य सरकारनं एसटीची थकित देणी देणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एसटीमध्ये नव्यानं इलेक्ट्रिक गाड्या दाखल होत असताना दुसरीकडे काही ठिकाणी एसटी बसेसची अवस्था फार बिकट झाली असून रस्त्यावर अनेक गाड्या बंद पडत असल्याचं देखील पाहायला मिळतं. असं ही श्रीरंग बरगे यांनी सांगितले

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.