नाशिक, दि. ७ जुलै २०२५ – MUHS student council elections महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थी परिषद निवडणूक खेळीमेळीच्या आणि लोकशाही पद्धतीने पार पडली. निवडणूक प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित प्रतिनिध्यांची घोषणा विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ आणि निवडणूक निर्णय अधिकारी व कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या हस्ते करण्यात आली.
(MUHS student council elections) विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी वाकचौरे अभिजीत भास्कर (वामनराव इथापे होमिओपॅथी कॉलेज, संगमनेर) यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी कांबळे सुजाता लक्ष्मण (एस.आर.टी.आर. वैद्यकीय महाविद्यालय, अंबेजोगाई) व नलवाडे आर्दश अनिल (शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, धाराशिव), सचिवपदी कावळे चैतन्य दत्ता (वामनराव इथापे नर्सिंग कॉलेज, संगमनेर) आणि सहसचिवपदी औसारमळे भुषण गोविंदराव (एस.के. होमिओपॅथिक कॉलेज, बीड) यांची निवड झाली.
विद्यापीठ अधिनियम १९९८ च्या कलम २३(२)(टी) नुसार अधिसभेसाठी निवडण्यात आलेले तीन विद्यार्थी प्रतिनिधी
▪️ दराडे उत्तरेश्वर बळीराम (बी.हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, धुळे)
▪️ महाजन निखील राजेंद्र (श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय, अमरावती)
▪️ निबांळकर पियुष संजय (एस.एम.बी.टी. आयुर्वेद कॉलेज, नाशिक)
या निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रियेत श्री. फुलचंद अग्रवाल, बाळासाहेब पेंढारकर, संदीप राठोड आणि डॉ. आर.टी. आहेर यांचा सहभाग होता. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रति-कुलगुरु डॉ. निकुंभ यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठ योजनांची माहिती पोहोचवण्याचं आणि संवादाचा पूल बनण्याचं आवाहन केलं. नव्या टीमकडून क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांत सक्रीय सहभाग अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.