Mumbai:’अक्षर भारती’सुलेखन कला प्रदर्शनाचे २८ जानेवारीला उदघाट्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार उदघाटन सोहळा :मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजन
मुंबई,दि,२२ जानेवारी २०२५ –‘अक्षर भारती’हे सुलेखन कला प्रदर्शन आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन जहांगीर आर्ट गॅलरी तील कलादालनात मंगळवार २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तसेच नवनीत प्रकाशनचे प्रमुख अनिल गाला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.या प्रदर्शनाची संकल्पना व संकलन जागतीक ख्यातकीर्त कॅलिग्राफर अच्युत पालव यांचे आहे.
भारत हा जसा शेतीप्रधान देश आहे तसाच तो लिपीप्रधान देखील आहे. अनेक देखण्या आणि समृद्ध लिप्यांनी भारत नटलेला आहे. याच विविध लिप्यांच सौंदर्य सर्वसामान्यांपर्यंत सुलेखनाच्या माध्यामातून पोहोचवण्यासाठी ‘अक्षर भारती’ हे सुलेखन कला प्रदर्शन आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन जहांगीर आर्ट गॅलरी तील कलादालनात आयोजित करण्यात आले आहे.
सात प्रमुख सुलेखनकार (अच्युत पालव, पूजा गायधनी, तृप्ती माने फुरिया, अमृता अमोदकर, श्रीकांत गवांदे, पेरीन कोयाजी, हर्षदा साळगावकर) यात सहभागी होणार आहेत.
निरनिराळ्या लिप्या चित्ररुपात सादर करून त्यात रंग कला , कल्पना, आणि अक्षरांची अमूर्त रचना ह्या प्रदर्शनाचा मुख्य पाया आहे.मराठी सह संस्कृत, मोडी, ब्राह्मी, शारदा, ग्रंथ, तमिळ, कन्नड, मल्याळम, ओडिया, आसामी, बंगाली, जैनी, सिद्धम यांसारख्या अभिजात आणि प्राचीन लिपी मधील काम पाहण्यास मिळणार आहे. भारतीय भाषा आणि लिपी यांची समृद्धी दर्शवणा-या “अक्षर भारती” या पुस्तकाचे ही यावेळी अनावरण होणार आहे.