Mumbai : खार पोलिस स्टेशन बाहेर भाजपा नेते किरीट सोमय्यांवर दगडफेक

व्हिडीओ पहा

0

मुंबई – आज रात्री भाजपा नेते किरीट सोमय्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले असतांना . किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकल्याचे समोर आलं आहे. या हल्ल्यात भाजपा नेते किरीट सोमय्या जखमी झाले आहे आणि सोमय्याच्या गाडीची काच हि फुटली आहे.

तर सोमय्या यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली होती. असा दावा शिवसैनिकांनी केला आहे.सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

पोलीस आयुक्तांनाही येथे येऊन तातडीने चौकशी करावी पोलिसांच्या उपस्थिती माझ्यावर हल्ला केला पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा आणि हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करा तोपर्यंत पोलिसस्टेशन मधून हलणार नाही असा पवित्रा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घेतला आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.