Mumbai Local Megablock : मध्य रेल्वेवर आजपासून २७ तासांचा ‘मेगाब्लॉक’:लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द
मुंबई,१९ नोव्हेंबर २०२२ – मुंबई कडे प्रवासकरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली असून आज रात्री पासून पासून मध्य रेल्वेच्या मार्गावर तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम आज रात्री पासून सुरु करण्यात येणार आहे.तसेच ठाण्यातील कोपरी ब्रिजच्या कामानिमित्त हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील १ हजार ९६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाक पुलाच्या कामासोबत कोपरी पुलाच्या कामासाठीही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
प्रवाशाची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने बेस्ट कडे या काळात जादा गाड्यांची मागणी केली असून बेस्टने ४७ जादा बसेस सोडणार असल्याचे मान्य केले आहे.ठाण्याकडून मुंबईकडे आणि मुंबईकडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना कोपरी ब्रिजजवळ दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी कोपरी ब्रिजच्या रुंदीकरणासाठी एकूण सात गर्डर टाकण्यात येणार आहे.तसेच .सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम देखील आज रात्री पासून सुरु होणार आहे.
आज १९ नोव्हेंबर रात्री ११ वाजे पासून उद्या २० नोव्हेंबर सकाळी ६ वाजेपर्यंत सात तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. यामुळे ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या शहरांमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यामुळे ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या शहरांमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.