मुंबई,दि,११ नोहेंबर २०२३ –मुंबईत हवेतील प्रदूषणची पातळी सातत्याने बिकट होत चालली असल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानं फटाक्यांच्या आतषबाजीवरील निर्बंध आणखी कठोर केले आहेत.
मुंबईतील वायू प्रदूषणाची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या याआधीच्या आदेशात बदल करत फटाके फोडण्याची वेळ तीन तासांवरून दोन तासांवर आणली आहे. त्यानुसार आता रात्री ८ ते १० या दोन तासांमध्येच मुंबईकरांना फटाके फोडता येणार आहेत.
मुंबईतील वायू प्रदूषणाच्या प्रश्नावर दाखल झालेल्या वेगवेगळ्या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढं सुनावणी सुरू आहे.याआधी ६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व महापालिका प्राधिकरणांच्या हद्दीत संध्याकाळी ७ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी न्यायालयानं दिली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा सुनावणी झाली.‘मुंबईत फटाके फोडण्याचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र, शहराच्या काही भागांत अद्यापही हवेच्या गुणवत्तेची स्थिती अत्यंत खराब आहे,’ असं निरीक्षण खंडपीठानं शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी नोंदवलं.
‘आपण एका धोकादायक आणि संकटाच्या परिस्थितीतून जात आहोत. अशा वेळी आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मुंबईची दिल्ली होता कामा नये, आपण मुंबईकरच राहूया, असं म्हणत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आपल्या ६ नोव्हेंबरच्या आदेशात बदल केले. यापुढं मुंबईत फटाके फोडण्याची वेळ रात्री ८ ते रात्री १० पर्यंत मर्यादित असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्याची परिस्थिती लक्षात घेता न्यायालयानं ६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेश मागे घेणे किंवा त्यात सवलत देणं योग्य वाटत नाही, असंही खंडपीठानं नमूद केलं.
काय आहेत न्यायालयाचे निर्देश?
त्याचप्रमाणे कचरा आणि भंगार वाहतूक करणाऱ्या वाहनांना महापालिकेच्या हद्दीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे ,बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहनं पूर्णपणे झाकली असतील तरच महापालिका हद्दीत प्रवेश मिळणार आहे. हे सर्व निर्बंध १९ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. तर १९ नोव्हेंबरनंतर संबंधित महापालिका क्षेत्रातील हवेच्या गुणवत्तेची पातळी विचारात घेऊन कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांना परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय होणार