दिवाळीतच मतदानाचा उत्सव!जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुका २ टप्प्यांत होणार?

2

मुंबई, ३१ मे २०२५ — Municipal Corporation Elections  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना अखेर गती मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी दिलेल्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाला आगामी चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार, राज्यात ऑक्टोबर महिन्यात, म्हणजेच दिवाळीच्या सुमारास, दोन टप्प्यांत जिल्हा परिषद (ZP) व महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने २०१७ मधील प्रभाग रचना कायम (Municipal Corporation Elections)ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीला पुन्हा एकदा त्या रचनेचा लाभ होण्याची चिन्हं आहेत. सध्या सुमारे ६८७ स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक कार्यरत आहेत. नागरिकांकडून लोकप्रतिनिधींच्या निवडीसाठी मागणी जोर धरू लागली आहे.

विशेष म्हणजे, निवडणुकांमध्ये सुमारे १ लाख ईव्हीएम (EVM) यंत्रांची गरज भासणार आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या फक्त ६४ हजार ईव्हीएम उपलब्ध आहेत. उर्वरित यंत्रांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येणार आहे. ईव्हीएमच्या ‘व्हाइट मेमरी’ कार्ड्स बदली करून नवीन निवडणुकीसाठी (Municipal Corporations) त्यांचा वापर शक्य होईल, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

सध्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीची प्रक्रिया वेगात सुरू असून ती येत्या तीन महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर निवडणुका दोन टप्प्यांत होतील असा अंदाज आहे  पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] ७ जून २०२५ : Rahul Gandhi Latest News विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील २०२४ च्या […]

  2. […] स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती देण्यासाठी राज्य सरकारने मोठा […]

Don`t copy text!