डॉ.सुवर्णा वाजे यांची हत्याच ! पती संदीप वाजेला अटक

0

नाशिक (प्रतिनिधी) -नाशिक महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा वाजे यांचा गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए आणि वाजे कुटुंबीयांचा डीएनए एकच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर वाडीवऱ्हे पोलिसांनी संदीप वाजे व त्याच्या इतर साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर सुवर्णा वाजे यांचे पती संदीला अटक करण्यात आली आहे.

डॉ . सुवर्णा वाजे यांचा मृतदेह  वाडीवऱ्हे  परिसरात पोलिसांना जळालेल्या अवस्थेत गाडीसह आढळून आला होता. हा मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचा असल्याची प्राथमिक माहिती होती. तत्पूर्वी डॉ.सुवर्णा वाजे यांच्या पतीने वाजे यांच्यासंदर्भात मिसिंग तक्रार देखील दाखल केली होती . यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते .

जळालेल्या अवस्थेत आढळलेली गाडी आणि मृतदेह डॉ .सुवर्णा वाजे यांचाच आहे का ? हे तपासण्यासाठी ‘ डीएनए ‘ चाचणी करण्यात आली होती . त्यात वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे .त्यामुळे आता नाशिक पोलिसांच्या तपासानुसार डीएनए एकच असल्याने डॉ .सुवर्णा वाजे यांच्यासोबत घातपात झाल्याचे स्पष्ट झालं आहे .

वाजे यांच्या हाडांचा डीएनए अहवाल नाशिक ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाला आहे . त्यामुळे डॉ .सुवर्णा वाझे यांना शहराबाहेर नेऊन त्यांची जाळून हत्या केल्याचे निदर्शनास येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी डॉ . सुवर्णा वाजे यांच्या बहीण आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत . माहेरच्या नातेवाईकांनीही त्यांना काही माहिती दिल्याचे समजते . तसेच डॉ . वाजे यांच्या पतीकडूनही माहिती घेण्यात आली आहे .

डॉ . सुवर्णा वाजे यांची गाडी जाळण्यासाठी संशयिताने कोणत्या ज्वलनशील पदार्थाचा वापर केला , याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे . शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले.

डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळात त्यांनी चांगली कामगिरी बजावली. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप पाडली. त्यामुळे पालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. विशेष म्हणजे २५ जानेवारी रोजी, मंगळवारी सायंकाळीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही टेन्शन नव्हते. मात्र,अचानक असे काय घडले, याचे गूढ वाढले होते अखेर पोलिसांनी घटनेचा छडा लावलाच

संदीप वाजेला अटक

डी एन ए रिपोर्ट प्राप्त झाल्याने त्या माहितीच्या आधारे वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे पती संदीप वाजे व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संदीप वाजे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!