“शेरशिवराज” चित्रपटात माझाही सहभाग हा अत्यंत अभिमानाचा क्षण – दिप्ती धोत्रे

0

मुंबई – नॅशनल अवॉर्ड फिल्म भोंगा, ब्लॉकबस्टर मुळशी पॅटर्न, आणि सुभाष घईच्या विजेता चित्रपटातुन प्रचंड यश मिळविलेली अभिनेत्री दीप्ती धोत्रे तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि सुंदर लुक साठी ओळखली जाते. दीप्ती धोत्रे केवळ मल्टीटॅलेंटेड अभिनेत्री नसून ती एक फिटनेस उत्साही देखील आहे , आणि तिचे सोशल मीडिया हे सागळे सांगते. फिटनेस साठी जिम्नॅस्टिकस आणि मलखंब करणारी ती एकमेव अभिनेत्री आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टक या सिनेमासत्रारतील चौथे पुष्प  “शेरशिवराज” हा चित्रपट शिवाजी महाराजांचा अफझल खानावर विजय आणि प्रतापगडाच्या लढाईत मराठा सैन्याच्या विजयाची कहाणी जिवंत केली आहे. पूर्वीच्या काळी कोंकणात सावंतांच घराणं ओळखलं जायचं , राजे सावंत यांची पत्नी सवंतीणीची भूमीला दीप्ती साकारतेय. तिचा अनुभव सांगताना अभिनेत्री म्हणते, ” शिवरायांचा इतिहास लोकांसमोर मोठ्या पडदयावर मांडताना त्यात थोडाफार का होईना माझाही सहभाग आहे. हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, हि व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला कोंकणी भाषा बोलावी लागली,यासाठी मी दिग्पाल सरांची मदत घेतली, माझं काम लोकांना आवडतंय याचा मला आनंद आहे, मुळात चित्रपट लोकांना आवडतंय यातच सागळ आलं.”

दीप्ती सोबत या चित्रपटात  स्वतःहा दिगपाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर , मुकेश ऋषी , अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, मृणाल कुलकर्णी आदी अभिनेत्यांची फौज बघायला मिळेल. खरंच, दिप्तीने तिच्या एक्सेपशनल अभिनय कौशल्याने अप्रतिम  काम केलंय. तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यामुळे आणि सुंदर दिसण्यामुळे या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या हृदयात आपली जागा केली आहे .

व्यावसायिक आघाडीवर दिप्ती धोत्रेने तिच्या मुळशी पॅटर्न, भोंगा, विजेता आणि इतर अनेक चित्रपटांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळवली आहे. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये भिरकिट आणि विषय क्लोज यांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त, अभिनेत्री बॉलीवूड इंडस्ट्रीवर राज्य करण्यासाठी सज्ज आहे जे Amazon प्राइमवर रिलीज होणार आहे . त्या बरोबर अभिनेत्री लवकरच उर्वशी रौतेला आणि रणदीप हुड्डा सोबत जिओ स्टुडिओ मालिका इन्स्पेक्टर अविनाश मध्ये अत्यंत वेगळ्या भुमिकेत दिसणार आहे .येत्या काही महिन्यांत या अभिनेत्रीचे आणखी काही रिलीज आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.