क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो मुळे प्रगतीशील नाशिकमध्ये गुंतवणुकीची संधी
पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद : २२ सदनिकाचे बुकिंग
नाशिक,दि. २७ ऑक्टोबर २०२३ –समृद्धी महामार्गाचा सिन्नर ते मुंबई हा टप्पा लवकरच पूर्णत्वास जात असून नाशिककरांना मुंबई मध्ये सहज जाता यावे यासाठी वडपे ते मुलुंड अशा एलेवेटेड कॅरीडोअर व रेल्वेच्या चौथ्या व पाचव्या लाईन साठी पाठपुरावा सुरु आहे. याचप्रमाणे नाशिक मध्ये लवकरच इलेक्ट्रिक हब चे उद्घाटन होणार असून नाशिकच्या सभोवताली अनेक पायाभूत प्रकल्पाची उभारणी सुरु आहे. त्यातच नाशिकच्या कनेक्टिव्हिटी मध्ये देखील खूप सुधारणा झाली असून नाशिक हून देशातील सर्वच प्रमुख शहरांशी संपर्क वाढला आहे. अशावेळी क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित या प्रॉपर्टी एक्स्पो मुळे नाशिक शहरातील रिअल ईस्टेट क्षेत्रात स्वप्नपूर्ती व गुंतवणुकीची योग्य संधी मिळाली असल्याचे प्रतिपादन खा. हेमंत गोडसे यांनी केले. ते क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२३ च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी मंचावर नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, मानद सचिव गौरव ठक्कर, प्रदर्शनाचे समन्वयक अंजन भालोदिया हे मान्यवर उपस्थित होते. ठक्कर डोम येथे या प्रदर्शनाचे आयोजन २६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून करण्यात आला. पाहुण्याचे स्वागत मानद सचिव गौरव ठक्कर यांनी केले. यानंतर आपल्या प्रास्तविकपर भाषणात बोलतांना अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले की, या प्रदर्शनाचा फक्त विक्री हा उद्देश नसून शहराचे ब्रांडीग राज्य व देश विदेशात अशा प्रदर्शनामुळे होते. बांधकाम व्यवसाय हा शहराची अर्थ वाहिनी असून ३५ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या क्रेडाई ने बांधकाम व्यवसायात विश्वासार्हता येण्यासाठी भरीव कार्य केले आहे. रेरा कायदा येण्यापूर्वी क्रेडाई तर्फे त्यांच्या सभासदांकडून कोड ऑफ कंडक्ट लागू केले होते. क्रेडाई च्या या भूमिकेला अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा नेहमीच सकारात्मक पाठींबा आहे. दसरा व दिवाळी या दरम्यान आयोजित या एक्स्पो मध्ये गृह खरेदीची नामी संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आ. सीमा हिरे –
नाशिक वेगाने विकसित होत आहे. शिक्षण, उद्योग व पर्यटनासाठी अनेकजण नाशिकला येत असतात. प्रदर्शनातील असंख्य पर्यायातून नागरिकांना निवड करणे सोपे होईल. क्रेडाई च्या सकारात्मक प्रयत्नास नेहमीच सहकार्य राहील. प्रदर्शनातील ८० स्टोल मधील ३०० हून अधिक पर्याया मधून नागरिकांना निवडीच्या अनेक संधी आहेत.
आ. देवयानी फरांदे –
आगामी कुंभ मेळ्यासाठी सिंहस्थ आराखड्याचे काम सुरु आहे. सिंहस्थ हि नाशिकच्या विकासासाठी मोठी पर्वणी असते. त्यानिमित्ताने शहरात अनेक नव्या संधी येऊ घातल्या आहेत. समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नाशिक – ठाणे अवघे एका तासावर येणार आहे. यामुळे नाशिक कडे येण्याचा ओघ अजून वाढणार आहे. यामुळे नाशिकचे मार्केटिंग अजून प्रभावीपणे मुंबई – ठाण्यात करावे असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी दिला.
आ. राहुल ढिकले –
नाशिक हे जलद गतीने वाढणारे शहर आहे अशी ओळख होण्यामध्ये क्रेडाई ची भूमिका मोलाची असून यामध्ये सर्व माजी अध्यक्षांचे देखील महत्वाचे योगदान आहे. क्रेडाई चा प्रवास मी बऱ्याच कालावधीपासून बघत असून सर्व नियमांप्रमाणे काम करणाऱ्या क्रेडाई सभासदांमुळे बांधकाम व्यवसाय नव्या उंचीवर पोहचला आहे.
उद्घाटन प्रसंगी क्रेडाई राष्ट्रीय चे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्र चे उपाध्यक्ष सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष नेमीचंद पोतदार, सुरेश अण्णा पाटील, उमेश वानखेडे, रवि महाजन उपस्थित होते. आभार सहसमन्वयक ऋषिकेश कोते यांनी मानले.
सदर प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष दिपक बागड, सुजॉय गुप्ता, जयंत भातंब्रेकर, नरेश कारडा, खजिनदार हितेश पोद्दार, सहसचिव सचिन बागड, अनिल आहेर, नरेंद्र कुलकर्णी, मनेजिंग कमिटी मेंबर मनोज खिंवसरा, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा हे प्रयत्नशील आहेत.