कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे नागपूरला इमर्जन्सी लँडिंग
विमान उडवून देवण्याची धमकी –सर्व प्रवासी सुरक्षित
नागपूर, दि. १७ जून २०२५ – Nagpur Emergency Landing News कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या 6E-2706 या विमानाला आज सकाळी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. सुरक्षेच्या दृष्टीने हे विमान तातडीने नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. विमानात १५७ प्रवासी होते आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
विमान कोचीहून सकाळी ९.२० वाजता दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते. काही वेळातच संबंधित विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. या धमकीनंतर वैमानिकांनी नागपूर एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली आणि तात्काळ विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आले.
विमानतळावर दाखल झालेल्या पोलीस, श्वान पथक व बॉम्ब शोधक पथकांनी संपूर्ण विमानाची तपासणी केली. सुदैवाने, तपासणीत काहीही संशयास्पद सापडले नसल्याचे सूत्रांकडून समजते. प्रवाशांना तातडीने विमानातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
अहमदाबाद येथील अलिकडच्या विमान अपघातानंतर अशा इमर्जन्सी घटनांमध्ये वाढ झाल्याचे जाणवते. प्रशासनाकडून ही धमकी अतिशय गांभीर्याने घेतली जात असून तपास सुरू आहे की ही धमकी कुणाकडून आणि कशासाठी देण्यात आली.
महत्वाचे मुद्दे:(Nagpur Emergency Landing News)
फ्लाइट क्रमांक: 6E-2706
मार्ग: कोची ते दिल्ली
प्रवासी संख्या: १५७
धमकीनंतर तात्काळ नागपूरमध्ये लँडिंग
तपासणीत कोणताही बॉम्ब आढळला नाही
सर्व प्रवासी सुरक्षित